Big earthquake Hits Assam : बुधवारी (28 एप्रिल) सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर तेजपूर आणि सोनितपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 6.4 तीव्रतेचे होते. या काळात लोक घाबरून घराबाहेर पडले होते. Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today
वृत्तसंस्था
गुवाहाटी : बुधवारी (28 एप्रिल) सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर तेजपूर आणि सोनितपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 6.4 तीव्रतेचे होते. या काळात लोक घाबरून घराबाहेर पडले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7:51 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी सोनितपूरमध्ये 6.4 तीव्रता नोंदवण्यात आली. गुवाहाटी आणि तेजपूरमध्येही भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची माहिती मिळताच लोकांमध्ये दहशत पसरली. ते आपापल्या घरातून बाहेर आले. यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.
घरांची पडझड, मोठे नुकसान
तीव्र भूकंपामुळे अनेक भागांत भिंती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी झाडेही कोसळली. भूकंपामुळे बरेच नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय उत्तर बंगाल आणि बिहारमधील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भूकंपाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा, अशी मी प्रार्थना करतो. तसेच, मी सर्व लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करतो. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून भूकंपाविषयी माहिती गोळा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today
महत्त्वाच्या बातम्या
- ठाण्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग, दुसरीकडे शिफ्ट करताना चार रुग्णांचा मृत्यू
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
- …तर २०२२ मध्ये महाराष्ट्रातही होऊ शकते विधानसभा निवडणूक, हे आहे कारण!
- Vaccine Registration : आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची मुभा, अशी करा नोंदणी
- कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु