• Download App
    भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण । Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today

    भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण

    Big earthquake Hits Assam : बुधवारी (28 एप्रिल) सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर तेजपूर आणि सोनितपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 6.4 तीव्रतेचे होते. या काळात लोक घाबरून घराबाहेर पडले होते. Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today


    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : बुधवारी (28 एप्रिल) सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर तेजपूर आणि सोनितपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 6.4 तीव्रतेचे होते. या काळात लोक घाबरून घराबाहेर पडले होते.

    नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7:51 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी सोनितपूरमध्ये 6.4 तीव्रता नोंदवण्यात आली. गुवाहाटी आणि तेजपूरमध्येही भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची माहिती मिळताच लोकांमध्ये दहशत पसरली. ते आपापल्या घरातून बाहेर आले. यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.

    घरांची पडझड, मोठे नुकसान

    तीव्र भूकंपामुळे अनेक भागांत भिंती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी झाडेही कोसळली. भूकंपामुळे बरेच नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय उत्तर बंगाल आणि बिहारमधील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

    आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भूकंपाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा, अशी मी प्रार्थना करतो. तसेच, मी सर्व लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करतो. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून भूकंपाविषयी माहिती गोळा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Big earthquake Hits Assam, magnitude of 6.4 on the Richter Scale today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी