• Download App
    Belgaum Bypoll Result : कोण मारणार बाजी ? मंगला अंगडी, सतीश जारकीहोळी की शुभम शेळके।Belgaum Lok sabha bypoll result BJP vs Shiv Sena

    Belgaum Bypoll Result : कोण मारणार बाजी ? मंगला अंगडी, सतीश जारकीहोळी की शुभम शेळके

    बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू . सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी होत आहे.


    खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. १८ लाख १३ हजार ५६७ पैकी १० लाख ८ हजार ६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. Belgaum Lok sabha bypoll result BJP vs Shiv Sena


    विशेष प्रतिनिधी

    बेळगाव : बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी सुरू आहे. तिथेच मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आलेली होती. भाजपच्या मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत.



    केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली.

    त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते. याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुढे

    बेळगाव पोटनिवडणुकांचे पहिले कल हाती, पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुढे

    काँग्रेस – सतीश जारकीहोळी : 7584
    भाजप – मंगला अंगडी : 4693
    महाराष्ट्र एकीकरण समिती – शुभम शेळके : 337

    Belgaum Lok sabha bypoll result BJP vs Shiv Sena

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!