• Download App
    कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची चाकू मारून हत्या; हिजाबविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने संताप; अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला। Bajrang Dal activists stabbed to death in Karnataka; Outrage over posting post on Facebook against hijab; Strangled freedom of expression

    कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची चाकू मारून हत्या; हिजाबविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने संताप; अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला

    वृत्तसंस्था

    बंगळूर : फेसबुकवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून हिजबावर पोस्ट लिहिणाऱ्या एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धर्मांधांनी चाकू मारून हत्या केली आहे. Bajrang Dal activists stabbed to death in Karnataka; Outrage over posting post on Facebook against hijab; Strangled freedom of expression

    कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी हत्या केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. हर्षा असे २६ वर्षीय बजरंग दल कार्यकर्त्याचे नाव आहे. हत्येनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढला आहे. शिवमोग्गा शहरातील सिगेहट्टी परिसरात काही समाजकंटकांनी गोंधळ घातला.

    दंगलीदरम्यान अनेक वाहनेही जाळण्यात आली. पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हर्षाने फेसबुक प्रोफाईल शेअर केल्याने प्राथमिक तपासात पोलिस याला हिजाब वादाशी जोडत आहेत.



    कर्नाटकातील उडुपीमध्ये हिजाब वादाचे प्रकरण समोर आल्यापासून बजरंग दल खूप सक्रिय आहे. अशा स्थितीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येकडे पोलिस कट म्हणून पाहत आहेत. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.

    Bajrang Dal activists stabbed to death in Karnataka; Outrage over posting post on Facebook against hijab; Strangled freedom of expression

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य