Thursday, 1 May 2025
  • Download App
    बाबा रामदेव राहूल गांधींना म्हणाले, एवढं बावळट असूनही चालत नाही|Baba Ramdev said to Rahul Gandhi, in spite of all this fuss, it does not work

    बाबा रामदेव राहूल गांधींना म्हणाले, एवढं बावळट असूनही चालत नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हिंदू आणि हिंदूत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा देश हिंदूत्ववादी नसून हिंदू आहे, असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांच्यावर योगगुरू बाबा रामदेव यांनी निशाणा साधला आहे. व्यक्ती आणि व्यक्तिमत्व एकच आहे.Baba Ramdev said to Rahul Gandhi, in spite of all this fuss, it does not work

    आता तुम्ही म्हणाल की व्यक्ती वेगळी आणि व्यक्तिमत्व वेगवेगळे आहे. ए बावळट, एवढं तरी वाचायला हवं, एवढं बावळट असून चालत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून हा देश देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे वक्तव्य राहूल गांधी यांनी जयपूरमध्ये झालेल्या रॅलीत केले होते.



    देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही, असे ते म्हणाले होते. यावर निशाणा साधताना बाबा रामदेव म्हणाले, हा अक्षरसमज आहे. संस्कृती आणि भारतीयत्वाचे आकलन हा खूप मोठा विषय आहे.

    हा फक्त राजकीय प्रपोगंडा आहे. हिंदू ही संस्कृती आहे आणि संस्कृतीची जाण हिंदुत्व आहे, असे रामदेव म्हणाले. सनातनचा अर्थ अनादी काळापासून चालत आलेला आहे. या देशात राहणाºया सर्व लोकांनी एका प्रवाहात चालायला पाहिजे, असे रामदेव म्हणाले.

    Baba Ramdev said to Rahul Gandhi, in spite of all this fuss, it does not work

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!

    ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप

    Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!