वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे” अशी मागणी योगगुरू रामदेव बाबा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या वतीने गो महासंमेलन आयोजित केले होते. त्यावेळी रामदेव बाबा यांनी ही मागणी केली. baba ramdev said declare cow as india national animal
गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे. हा प्रस्ताव टीटीडी ट्रस्टनेही पाठल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे.
“पतंजलीने गायींसाठी गोरक्षण मोहीम सुरू केली आहे. गायींच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही आघाडीवर आहोत” असेही त्यांनी सांगितलं. यासोबतच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी गो महासंमेलनाबद्दल माहिती दिली होती. हिंदू धर्माचा प्रचार केल्याबद्दल त्यांनी टीटीडीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांचेही कौतुक केले.
baba ramdev said declare cow as india national animal
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान