वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणे आयुर्वेदाचे डॉक्टर किचकट शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना एमबीबीएससारख्या समान वेतनाचा हक्क नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.Ayurvedic doctors not entitled to equal pay as MBBS, Supreme Court overturns Gujarat High Court decision
आयुर्वेद व एमबीबीएस डॉक्टरांना समान वेतनाचा हक्क असल्याचा गुजरात हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवला.
न्या. व्ही. सुब्रमण्यन आणि न्या. पंकज मिथल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आयुर्वेद डॉक्टर एमबीबीएसप्रमाणे काम करीत नाहीत, असे स्पष्ट करून कोर्ट म्हणाले की, आधुनिक काळात आयुर्वेदाला ‘ऐतिहासिक गौरवाचे’ स्थान असेल, परंतु आयुर्वेद डॉक्टर शस्त्रक्रिया करू शकत नाहीत.
हे 2013 मधील प्रकरण आहे. गुजरात सरकारने हायकोर्टाच्या एका आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले. टिक्कू वेतन आयोगातील तरतुदींनुसार आयुर्वेद डॉक्टरांनाही एमबीबीएसप्रमाणे वेतन लाभाचा हक्क आहे, असे सरकारचे म्हणणे होते.
Ayurvedic doctors not entitled to equal pay as MBBS, Supreme Court overturns Gujarat High Court decision
महत्वाच्या बातम्या
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा राहुल गांधींना सवाल, ‘हिंमत असेल तर पवारांच्या अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा?’
- Operation Kaveri: सुदानमधून भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान, नागरिकांच्या ‘भारतीय सेना झिंदाबाद, पीएम मोदी झिंदाबाद’च्या घोषणा
- पुंछ हल्ल्यानंतर पाकिस्तानला भरली धडकी, आणखी एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ची भीती
- चीनच्या प्रत्येक कृतीला भारतही देणार जशास तसे उत्तर! LAC वर रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर फोकस