विशेष प्रतिनिधी
मेलबर्न : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतात अडकून पडलेल्या आपल्या नागरिकांना परत येण्याची परवानगी देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्याच नागरिकांना मायदेशी येण्यास त्यांच्या इतिहासात प्रथमच बंदी घालताना १४ दिवसांहून अधिक काळ भारतात वास्तव्य केले असल्यास त्या व्यक्तीला परतण्यास मनाई केली होती. तरीही नागरिकांनी परत येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पाच वर्षे तुरुंगवास आणि ५० हजार डॉलर दंड करण्याचा इशाराही देण्यात आला होता. Australia lift restriction for India
सरकारच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियामधील अनेक लोकप्रतिनिधी, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. आपल्याच नागरिकांना विदेशामध्ये अडकवून ठेवण्याचा हा प्रकार असल्याची टीका झाली होती. तरीही सरकारने आदेश कायम ठेवला होता. या आदेशाची मुदत १५ तारखेला संपत असून त्यापुढे हे निर्बंध वाढविण्याची गरज नसल्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी म्हटले आहे.
Australia lift restriction for India
महत्त्वाच्या बातम्या