• Download App
    कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हयात रिजेन्सी झाले बंद|Atul Bhatkhalkar criticizes two CM, The Prime Minister has shown them

    दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी लायकी दाखविली, आता तरी पोच ओळखून बाता माराव्यात, अतुल भातखळकर यांची टीका

    देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.Atul Bhatkhalkar criticizes two CM, The Prime Minister has shown them


    प्रतिनिधी

    मुंबई : देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. स्वदेशी बनावटीच्या लसींमुळे भारताने लसीकरण मोहिमेत वेग घेतल्याचे सांगून १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे.



    भातखळकर म्हणाले, आधी लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी करून तोंडावर आपटलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आदी राज्य सरकारांच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्सीर मात्रा लागू केली. आजच्या जाहीर संबोधनात पंतप्रधानांनी जनतेला दिलासा देणारी सर्वांना मोफत लस योजनेची घोषणा केली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं २५ टक्के काम होतं, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे. येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार नवीन नियमावली लागू करणार आहे.

    या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्ये मिळून नवीन नियमावली तयार करतील. २१ जूनपासून देशातील सर्व राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वत: खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसधोरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती. ठाकरे यांनी लसीसाठी ग्लोबल टेंडर काढून एकरकमी चेक देऊन लस खरेदी करणार असल्याचे म्हटले होते.

    Atul Bhatkhalkar criticizes two CM, The Prime Minister has shown them

     

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त