वृत्तसंस्था
नवी दिल्ली – ; दिल्ली की दूरी, दिल की दूरी हटवायचीय, असे भावनात्मक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढल्यावर Positive note वर आजची जम्मू – काश्मीर विषयावरची सर्वपक्षीय बैठक संपली. atmosphere of safety & security needs to be ensured for all in J&K. PM said he wants to remove ‘Dilli ki Duri’ & ‘Dil Ki Duri’: Sources
राज्यात सर्व घटकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात काम करता आले पाहिजे. यासाठी आपण सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. राजकीय मतभेद राहिले तरी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले. यातच त्यांनी दिल्ली की दूरी, दिल की दूरी हटवायचीय, असे भावनात्मक उद्गार काढल्याने बैठकीनंतरही सौहार्दपूर्ण वातावरण तयार झाले आहे.
जम्मू – काश्मीरसंबंधी पंतप्रधानांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सकारात्मक वातावरणात झाली. पंतप्रधानांनी निवडणूकीचे सूतोवाच केले. जम्मू – काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती अपनी पार्टीचे नेते अल्ताफ बुखारी यांनी दिली. ते या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाले होते. सुमारे अडीच तास चाललेली बैठक संपल्यानंतर त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
अल्ताफ बुखारी म्हणाले, की पंतप्रधानांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची मते ऐकून घेतली. केंद्र सरकार राज्यात निवडणूका घेण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघांची फेररचना करण्यास सुरूवात झाली की त्या प्रक्रियेत सर्व पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मतदारसंघ फेररचना पूर्ण झाली की निवडणूका होतील, असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले, असे अल्ताफ बुखारी यांनी सांगितले.
सर्वपक्षीय नेत्यांनी जम्मू – काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केली. तिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी दिली.