• Download App
    आत्मनिर्भर भारतात नौदलाचेही योगदान; 39 पैकी 37 युद्धनौका - पाणबुड्या भारतातच निर्मित!! । Atmanirbhar bharat; Indian Navy contributed a lot, most war ships are made in India

    आत्मनिर्भर भारतात नौदलाचेही योगदान; ३९ पैकी ३७ युद्धनौका – पाणबुड्या भारतातच निर्मित!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत भारतीय नौदलाने देखील अतुलनीय योगदान दिले असून 39 युद्धनौकांना पैकी 37 युद्धनौका आणि आणि पाणबुड्या यांची निर्मिती भारतातल्या विविध डॉकयार्डमध्ये करण्यात आली आहे, अशी महत्वपूर्ण माहिती नवे नौदल प्रमुख एडमिरल हरि कुमार यांनी दिली आहे. Atmanirbhar bharat; Indian Navy contributed a lot, most war ships are made in India

    भारताच्या उत्तर सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि कोरोनाच्या लाटा यामुळे जी मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नौदलाने पूर्ण तयारी केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी नौदलाच्या वैद्यकीय विभागाने किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत कोविड सेंटर्स देखील उभारली आहेत, याची माहिती ॲडमिरल हरि कुमार यांनी दिली आहे.



    आत्मनिर्भर भारत योजनेत यापुढे देखील नौदलाचे योगदान अधिक राहील. नौदलाला आवश्यक असणारी सर्व सामग्री भारतातच निर्मित केली जाईल. आवश्यक ती आर्थिक आणि तांत्रिक गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान अपडेट करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ यासाठी मोठी गुंतवणूक नौदल करणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय नौदलाला तंत्रज्ञान दृष्ट्या देखील आत्मनिर्भर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे ॲडमिरल हरि कुमार म्हणाले.

    Atmanirbhar bharat; Indian Navy contributed a lot, most war ships are made in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही