वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर ऑलिम्पियन खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव तर सुरू आहेच, पण त्याचबरोबर मोदी सरकारच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाची देखील चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामध्ये काही अग्रगण्य खेळाडू सहभागी झाले आहेत.Athlet Anju Bobby George explained the difference between sports policy of modi government and others
भारताची सुपरस्टार ॲथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिने मोदी सरकार आणि आधीची सरकारे यांच्या क्रीडा विषयक दृष्टीकोन आणि धोरण यातला मर्मभेद समजावून सांगितला आहे. अंजू बॉबी जॉर्ज ही सुपरस्टार ॲथलिट. तिने लांब उडीत वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला ब्राँझ पदक मिळवून दिले आहे. 2010 च्या दशकात भारताचे प्रतिनिधित्व करत होती. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, सार्क गेम्स यामध्ये तिने पदके मिळवली आहेत.
तिने एका विशेष मुलाखतीत मोदी सरकार आणि आधीची सरकारे यांच्या क्रीडा धोरणाविषयी भाष्य केले आहे. अंजू बॉबी जॉर्ज म्हणाली, की मोदी सरकार खेळाडूंवर विश्वास टाकून त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करते. क्रीडा स्पर्धेआधी आणि क्रीडा स्पर्धेनंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंची बोलतात.
यातून खेळाडूंना भरघोस प्रेरणा मिळत राहते. खेळाडूंच्या कौशल्यावर सरकार भर देते आहे. एक दीर्घकालीन धोरण आखून हे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूंची प्रगती खेळांमध्ये कशी होते यावर target oriented काम केले जात आहे. माझ्या क्रीडा कारकिर्दीत हे मी “मिस्ड” केले आहे.आता 2024, 2030 या ऑलिंपिकची भारतीय खेळाडूंची तयारी सुरू झाली आहे त्यात सरकार धोरण ठरवून लक्ष घालत आहे हे ही तिने आवर्जून स्पष्ट केले.
आजचे क्रीडामंत्री ऑलिंपिक व्हिलेजला भेट देतात. खेळाडूंच्या सुविधा, साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे कसे राहील. त्यांना आपल्या क्रीडा प्रकारावर लक्ष कसे केंद्रित करता येईल, याकडे क्रीडामंत्री लक्ष देतात. किरण रिजिजू, अनुराग ठाकूर हे यामध्ये सातत्याने लक्ष घालून आहेत याकडे अंजू बॉबी जॉर्ज हिने लक्ष वेधले आहे.
पंतप्रधान मोदी फक्त विजयी खेळाडूंशी बोलत नाहीत, तर ते कामगिरीत कमी पडलेल्या खेळाडूंशी देखील संवाद साधतात. त्यातून खेळाडूंना कामगिरी उंचविण्यासाठी प्रोत्साहन मिळते, हेही तिने आवर्जून सांगितले. आधीच्या सरकारांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले नाही असे नाही.
तिने जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन शिपमध्ये ब्राँझ मेडल जिंकले तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तिचे खास अभिनंदन केले होते, याकडे तिने लक्ष वेधले आहे. परंतु यापेक्षा फारसे काही त्यावेळच्या सरकारांकडून घडत नव्हते ही खंत देखील तिने सौम्यपणे बोलून दाखविली. एक प्रकारे मोदी सरकारच्या टॉप्स पॉलिसी विषयी अंजू बॉबी जॉर्ज समाधान व्यक्त केले आहे.
Athlet Anju Bobby George explained the difference between sports policy of modi government and others
महत्त्वाच्या बातम्या
- मृत एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नी, मुलाचा अपमान बुलढण्यात कार्यालयातून धक्के मारून दिले हाकलून
- टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती
- MADE IN INDIA : मोदी है तो मुमकिन है ! स्वदेशी टॉय फॅक्ट्री 410 कोटींची गुंतवणूक ; 2024 पर्यंत भारतीय खेळणी उद्योग उलाढाल 200 अब्ज ; यासह हजारो रोजगार…
- प्रकृती बिघडल्याने एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल