Assam Elections : ईव्हीएमवरून गोंधळ सुरू असताना आसामच्या हाफलोंग मतदान केंद्रावर जास्त मतदानाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बूथवर एकूण 90 मतदार आहेत, परंतु मतांची संख्या 181 भरली आहे. या प्रकरणात सेक्टर अधिकारी, पीठासीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये बूथ स्तरावरील अधिकाऱ्याचाही समावेश आहे. Assam Elections 90 voters at polling Booth, but 181 votes recorded in EVM; 6 including officer suspended
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : ईव्हीएमवरून गोंधळ सुरू असताना आसामच्या हाफलोंग मतदान केंद्रावर जास्त मतदानाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बूथवर एकूण 90 मतदार आहेत, परंतु मतांची संख्या 181 भरली आहे. या प्रकरणात सेक्टर अधिकारी, पीठासीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये बूथ स्तरावरील अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
भाजप उमेदवाराच्या वाहनात आढळले होते ईव्हीएम
नुकतेच आसामच्या पाथरकंडी येथे भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी विरोधकांनी भाजप तसेच निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढविला. यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले होते की, गाडी बंद पडली होती. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना भाजप उमेदवाराच्या गाडीत लिफ्ट घ्यावी लागली. याप्रकरणी आयोगाने अधिकाऱ्यांना निलंबितदेखील केले आहे. यासह संबंधित बूथवर पुन्हा निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयोगाची कार बंद पडली होती
निवडणूक आयोगाची कार बंद पडल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी तेथून जात असलेल्या एका कारमध्ये लिफ्ट घेतली. ही कार भाजप आमदाराची होती. या कारवरही हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आयोगाच्या वाहनावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हाही दाखल केला. ईव्हीएम ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईव्हीएम सुरक्षित आहे, यंत्रासोबत कोणतीही छेडछाड झाली नाही.
शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू
आसाममध्ये मंगळवारी अखेरच्या टप्प्यासाठी निवडणूक सुरू आहे. या टप्प्यात राज्यातील 12 जिल्ह्यांतील 40 जागांवर मतदान होत आहे. त्यात जळुकबारी जागादेखील आहे, येथून सरकारचे मंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते हेमंत बिस्वा सरमा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी 27 मार्च आणि 1 एप्रिल रोजी मतदानाचे पहिले दोन टप्पे झाले. यावेळी 47 आणि 39 जागांसाठी मतदान झाले. निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी येणार आहे.
Assam Elections 90 voters at polling Booth, but 181 votes recorded in EVM; 6 including officer suspended
महत्त्वाच्या बातम्या
- तृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित
- BJP Foundation Day : अमित शाह-जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन, पंतप्रधान मोदी करणार संबोधित
- महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड अनिल देशमुख पाठोपाठ आता ‘ या ‘ मंत्र्यांची विकेट
- देशमुखांचा राजीनामा राजकारणात शब्दयुद्ध : भाजपचा वार राष्ट्रवादीचा पलटवार ; चित्रा वाघ-रूपाली चाकणकर आमने-सामने
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार