Assam CM Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी जिहादवर एक विचित्र विधान केले आहे. ते म्हणाले की, हिंदू मुलाने हिंदू मुलीशी खोटे बोलणेदेखील जिहादच आहे. यासाठी आसाम सरकार सर्व प्रकारच्या लव्ह जिहादविरुद्ध कायदा आणणार आहे. Assam CM Himanta Biswa Sarma To Bring Anti Love Jihad Law in state Says Hindu Boy Lying To Hindu Girl Is Jihad
विशेष प्रतिनिधी
दिसपूर : आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी जिहादवर एक विचित्र विधान केले आहे. ते म्हणाले की, हिंदू मुलाने हिंदू मुलीशी खोटे बोलणेदेखील जिहादच आहे. यासाठी आसाम सरकार सर्व प्रकारच्या लव्ह जिहादविरुद्ध कायदा आणणार आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली जिहादची नवी व्याख्या
शनिवारी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, जर हिंदू मुलगा एखाद्या हिंदू मुलीशी खोटे बोलला, तर तोही जिहाद आहे. आम्ही त्याविरुद्ध कायदा आणू. ते पुढे म्हणाले की, हिंदुत्व हा 5000 वर्षे जुना जगण्याचा मार्ग आहे. बहुतेक धर्मांचे अनुयायी हिंदू धर्माचे वंशज आहेत.
ते म्हणाले की, लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरच आसामच्या विधानसभेत मांडला जाईल. याशिवाय गोरक्षा कायदा आणि दोन मूल धोरणही आसाममध्ये आणण्याची त्यांची योजना आहे. यापूर्वी, यूपी, गुजरात आणि मध्य प्रदेशातही लव्ह जिहादविरोधी कायदे लागू झाले आहेत.
आम्हाला लव्ह जिहाद शब्द वापरायचा नाही
सरमा म्हणाले की, आम्हाला लव्ह जिहाद हा शब्द वापरायचा नाही, कारण आम्हाला वाटते की, एखाद्या हिंदूनेही हिंदूची फसवणूक करू नये. आम्ही कायदा आणू, पण तो फक्त मुस्लिमविरोधी नसेल. आमचा कायदा हिंदू आणि मुस्लिम दोन्हींसाठी समान असेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात लसीकरण मोहीम जोरात सुरू
जिहादव्यतिरिक्त, हेमंत बिस्वा सरमा यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले की, आसाममध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकार सापडला नाही. आम्ही जीनोम सिक्वेंसिंग करत आहोत. आसाम सरकार या परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहे. राज्यात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जुलै रोजी ईशान्य राज्यांसह लसीकरणावर बैठक घेणार आहेत.
याशिवाय शेजारच्या राज्यांच्या सीमेवर सध्या सुरू असलेल्या तणावावर ते म्हणाले की, आसाम-नागालँड आणि आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही बाजूंनी तणाव आहे. घटनात्मक सीमांच्या रक्षणासाठी आसाम पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Assam CM Himanta Biswa Sarma To Bring Anti Love Jihad Law in state Says Hindu Boy Lying To Hindu Girl Is Jihad
महत्त्वाच्या बातम्या
- ATS ने अलकायदाचा कट हाणून पाडला, लखनऊसह अनेक जिल्ह्यांत साखळी स्फोट घडवण्यापूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक, जिवंत प्रेशर कुकर बॉम्बही जप्त
- धक्कादायक : बंगाली अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या, कोलकाता पोलिसांकडून गुन्हा दाखल
- पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लोकसंख्या धोरण 2021-30 ची केली घोषणा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे!
- राज्यात एकतर कडक लॉकडाउन लावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती