• Download App
    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा खंबीरपणे पोलीसांच्या पाठीशी, कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगत गुन्हेगारांविरुध्द एल्गार|Assam Chief Minister Hemant Biswa Sarma strongly backs police, says there is complete freedom of action against criminals

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा खंबीरपणे पोलीसांच्या पाठीशी, कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगत गुन्हेगारांविरुध्द एल्गार

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी गुन्हेगारांविरुध्द एल्गार पुकारला असून पोलीसांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे. अनेक दशकांपासून चकमकी होत आलेल्या आहेत. सहानुभूती महत्त्वाची आहे; परंतु चुकीच्या जागी सहानुभूती घातक आहे.Assam Chief Minister Hemant Biswa Sarma strongly backs police, says there is complete freedom of action against criminals

    पोलिसांनी चुकीचे केले, असा संदेश येथून गेला, तर ते पुन्हा निष्काळजी होतील, असे त्यांनी विधानसभेत ठणकावून सांगितले.राज्याच्या मुख्यमंत्री या नात्याने मी पूर्ण जबाबदारीने सांगतो की, गोवंशाची तस्करी, अमली पदार्थांचा व्यवसाय, मानव तस्करी, महिला व बालकांविरुद्धचे गुन्हे, तसेच प्रत्येक गुन्ह्याविरोधात आमची मोहीम सुरूच राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.



    आसाममध्ये मागील दोन महिन्यांत झालेल्या चकमकींवर होत असलेल्या टीकेवर पलटवार करताना मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुरुवारी म्हटले आहे की, राज्य पोलिसांना कायद्याच्या कक्षेत राहून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. विधानसभेच्या शून्य प्रहरात विरोधी पक्षाचे नेते देवव्रत सैकिया यांनी राज्यात चकमकींची संख्या वाढत असल्याच्या मुद्द्यावर चचेर्ला सुरुवात केली.

    चचेर्ला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे सभागृह कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याच्या विरोधात आहे, असा संदेश सर्व आमदारांनी द्यावा. सभागृहाचा नेता असल्यामुळे मी आसाम पोलिसांचे कार्य, विशेषत: माज्या कार्यकाळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो.

    कायद्याच्या कक्षेत राहून गुन्हेगारांवर कारवाई करायची असेल, तर पोलिसांना त्याची पूर्ण परवानगी आहे.राज्यात मागील दोन महिन्यांत पोलिसांशी झालेल्या चकमकीत १५ गुन्हेगार ठार करण्यात आले आहेत. यात २३ जण जखमी झाले आहेत. गुन्हेगारांनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून हल्ला केल्याच्या, तसेच पलायन करण्याच्या प्रयत्नाच्या वेळी या चकमकी झाल्या आहेत.

    सरमा म्हणाले, आत्मविश्वासाने पुरेपूर भरलेले हे सरकार आहे. गुन्हेगारांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, तर कायद्याच्या कक्षेत राहून त्यांचा बंदोबस्त करण्याची इच्छाशक्ती ठेवणारे आहे, हे गुन्हेगारांना कळले पाहिजे. पशुतस्करी प्रकरणात मागील दोन महिन्यांत ५०४ जणांना गजाआड करण्यात आले आहे.

    यातील चार आरोपी पलायन करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले. पोलिसांनीच त्यांना रुग्णालयात नेले व उपचारानंतर न्यायालयात हजर केले. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर टीका करणारे लोक कायदा व मानवाधिकाराचा हवाला देत आहेत; परंतु तोच कायदा व संविधान पोलिसांना स्वसंरक्षणाचा तसेच गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार देत आहे.

    Assam Chief Minister Hemant Biswa Sarma strongly backs police, says there is complete freedom of action against criminals

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!