• Download App
    काँग्रेसच्या अंतर्गत समस्या वाऱ्यावर; गांधी परिवार सिमल्यात सुट्टीवर!! । As Things Settle in Punjab, Gandhi Family Reaches Shimla

    काँग्रेसच्या अंतर्गत समस्या वाऱ्यावर; गांधी परिवार सिमल्यात सुट्टीवर!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंजाबमधला नेतृत्व बदलाचा घोळ, त्यानंतर मुख्यमंत्री जरी नेमला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ तयार होण्याचा घोळ, उत्तर प्रदेशात निवडणुकांची अर्धवट तयारी, या काँग्रेसच्या अंतर्गत समस्या वार्‍यावर सोडून गांधी परिवार सिमल्यात सुट्टीवर गेला आहे. As Things Settle in Punjab, Gandhi Family Reaches Shimla

    सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सध्या प्रियांका गांधी यांच्या आलिशान निवासस्थानी एकत्र राहत असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा सिमला दौरा जाहीर करण्यात आला नव्हता. पण येनकेनप्रकारेण ना तो बाहेर आलाच. प्रियांका गांधी यांचे सिमल्यापासून आठ किलोमीटर दूर छराबवडा तेथे आलिशान निवासस्थान आहे. तेथे सध्या गांधी परिवार सुट्टीचा आनंद घेण्यात मग्न आहे. राष्ट्रपतींचे ग्रीष्मकालीन निवासस्थान “द रिट्रीट”च्या जवळच प्रियंका गांधी यांचे निवासस्थान आहे.



    हिमाचल प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी २००७ मध्ये खास सवलत देऊन प्रियांका गांधी यांच्यासाठी छराबावडा इथली जमीन उपलब्ध करून दिली होती. तिच्यावर आलिशान निवासस्थान बांधायला दहा वर्षे लागल. प्रियांकाला पसंत पडले नाही म्हणून त्यातला काही भाग पाडण्यात आला होता. परंतु आता हे निवासस्थान त्यांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठरल्यानंतर प्रियांका गांधी आपल्या कुटुंबासह नियमितपणे तिथे जात असतात.

    या वेळी सोनिया आणि राहुल गांधी देखील त्यांच्या समवेत आहेत. राहुल गांधींनी पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवल्याचे सांगण्यात येत आहे. पण तिथल्या समस्या संपलेल्या नाहीत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना पहिल्या दिवसापासून नव्या नव्या वादाला सामोरे जावे लागत आहे. अजून मंत्रीमंडळाचीही स्थापना झालेली नाही. फक्त मुख्यमंत्री आणि दोन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यावर पंजाबचे सरकार सुरू आहे.

    प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी आहे. योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव आत्तापासूनच प्रचाराच्या कामाला लागले आहेत. सलमान खुर्शीद यांनी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीरही केले आहे. पण प्रियांका गांधी सध्या हिमाचल प्रदेश मध्ये सुट्टीचा आनंद घेण्यात मग्न आहेत.

    As Things Settle in Punjab, Gandhi Family Reaches Shimla

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!