वृत्तसंस्था
कुलगाम : जम्मू काश्मीसरच्या कुलगाम येथे झालेल्या चकमकीत लष्करे तय्यबा पुरस्कृत ‘टीआरएफ’ चे दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी काश्मी्र खोऱ्यातील अनेक घातपाती कारवायांत सामील होते. Army’s daring action continues in Kashmir; Two terrorists killed
लष्कराने सध्या काश्मीरात व्यापक मोहीम सुरू केली असल्याने दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहे. दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते लष्करे तय्यबा किंवा टीआरएफसाठी काम करत होते. त्यांनी अनेक हल्ले घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई सुरू होताच चकमक झाली.