Thursday, 8 May 2025
  • Download App
    पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधी पण किती काळ त्यांच्या कृतीवर अवलंबून, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा इशारा|Army chief Manoj Narwane warns of arms embargo on Pakistan border but how long it depends on their actions

    पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधी पण किती काळ त्यांच्या कृतीवर अवलंबून, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा इशारा

    पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी असली तरी किती काळ हे शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी इशारा दिला आहे. सीमेवरील दहशतवादाचे जाळे अद्याप कायम असल्यामुळे आपल्या तयारीत कुठलेही शैथिल्य येणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.Army chief Manoj Narwane warns of arms embargo on Pakistan border but how long it depends on their actions


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी असली तरी किती काळ हे शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी इशारा दिला आहे.

    सीमेवरील दहशतवादाचे जाळे अद्याप कायम असल्यामुळे आपल्या तयारीत कुठलेही शैथिल्य येणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.लष्करप्रमुख जनरल नरवणे काश्मीरच्या दोन दिवसांच्या भेटीवर होते.



    यावेळी बोलताना ते म्हणाले, नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी सध्या लागू आहे. ती कायम राहील याची जबाबदारी संपूर्णत: पाकिस्तानवर आहे. ते शस्त्रसंधीचे पालन करतील, तोवर ती पाळण्याची आमची इच्छा आहे.

    नियंत्रण रेषेच्या पलीकडील भागात दहशतवादी शिबिरे आणि दहशतवाद्यांचा वावर यांसह इतर दहशतवादी कारवाया पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू आहेत. त्यामुळे आमच्या तयारीमध्ये कुठलीही शिथिलता येऊ शकत नाही.

    शस्त्रसंधीला आता १०० दिवस झाले असल्यामुळे पाकिस्तानवर भरवसा ठेवला जाऊ शकतो काय, असे विचारले असता लष्करप्रमुख म्हणाले, भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक दशकांपासून अविश्वाास आहे.

    त्यामुळे त्या आघाडीवरील परिस्थिती एका रात्रीत बदलू शकत नाही. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे खऱ्या अथार्ने पालन केले, तर लहान-लहान पावलांमुळेही वाढीव फायदे होऊ शकतात.

    Army chief Manoj Narwane warns of arms embargo on Pakistan border but how long it depends on their actions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी