• Download App
    ९० फूट खोल बोअरवेलमध्ये १६ तास अडकलेल्या अनिलची सुटका, पाईपमधून अन्नपाणी पुरविले| Anil, who was trapped for 16 hours in a 90 feet deep borewell, and food and water were supplied through a pipe

    ९० फूट खोल बोअरवेलमध्ये १६ तास अडकलेल्या अनिलची सुटका, पाईपमधून अन्नपाणी पुरविले

    दारात चारच दिवसांपूर्वी घेतलेल्या ९० फूट खोल बोअरवेलमध्ये चार वर्षांचा मुलगा पडला. दोरीच्या सहाय्याने त्याला अन्नपाणी पुरविले. सुमारे सोळा तास जीवन-मरणाच्या संघर्षात अखेर अनिलने विजय मिळविला. Anil, who was trapped for 16 hours in a 90 feet deep borewell, and food and water were supplied through a pipe


    विशेष प्रतिनिधी

    जोधपूर : दारात चारच दिवसांपूर्वी घेतलेल्या ९० फूट खोल बोअरवेलमध्ये चार वर्षांचा मुलगा पडला. दोरीच्या सहाय्याने त्याला अन्नपाणी पुरविले. सुमारे सोळा तास जीवन-मरणाच्या संघर्षात अखेर अनिलने विजय मिळविला.

    अनिल देवासी (चार वर्षे) याला १६ तासांनंतर शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सुरक्षितपणे वर काढण्यात आले. मुलाचा श्वास गुदमरू नये, म्हणून पाइपचा वापर करून प्राणवायू बोअरवेलमध्ये सोडण्यात आला, तसेच अन्नही टाकण्यात आले.



    मुलाला झोप लागू नये, म्हणून पथके सतत त्याच्या संपर्कात होती. याच मुलाचे वडील नागाराम देवासी यानी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या स्वत:च्या शेतात ही बोअरवेल खोदली होती. बोअरवेलला झाकण होते, पण मुलाने ते खेळताना काढले. त्यात डोकावून पाहताना तो घसरून आतमध्ये पडला.

    जालोर जिल्ह्यातील लाछरी खेड्यात गुरुवारी दुपारी अनिल खेळताना बोअरवेलमध्ये पडला होता, असे पोलिसांनी म्हटले. प्रशासनाने या कामासाठी स्थानिक रहिवासी मधाराम सुतार यांची मदत घेतली. त्यांनी स्वत: तयार केलेल्या लूप टाइप टूलचा वापर अनिलच्या सुटकेसाठी केला.

    बोअरवेल्समध्ये अडकून पडलेल्या मोटारी वर काढण्यासाठी सुतार यांनी यापूर्वी या तंत्राचा उपयोग केला होता. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी राज्य आपदा बचाव पथक आणि राष्ट्रीय आपदा बचाव पथकाच्या मदतीने अनिल देवासीची सुटका करण्याचे काम सुरू केले होते.

    बरेच प्रयत्न करूनही यश येत नसल्यामुळे काही ग्रामस्थांनी या कामासाठी सुतार यांची मदत घ्यावी, अशी सूचना केली कारण सुतार यांच्याकडील विशेष साधन या कामी उपयोगाला येऊ शकते, असे त्यांना वाटले, असे अधिकारी म्हणाला.

    Anil, who was trapped for 16 hours in a 90 feet deep borewell, and food and water were supplied through a pipe

    महत्वाच्या  बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही