• Download App
    संतप्त ममतांनी थेट राज्यपाल धनखड यांना केले ट्विटरवर ब्लॉक!Angry Mamata directly blocks Governor Dhankhad on Twitter!

    संतप्त ममतांनी थेट राज्यपाल धनखड यांना केले ट्विटरवर ब्लॉक!

    प्रतिनिधी

    कोलकाता : राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद आज एका वेगळ्याच वळणावर गेला. प्रत्यक्षातील संवाद यापूर्वीच संपला आहे; पण आता आभासी संवाददेखील ममतांनी बंद केला आहे. त्यांनी धनखड यांना ट्विटरवर चक्क ब्लॉक केले आहे.Angry Mamata directly blocks Governor Dhankhad on Twitter!

    “जगदीप धनखड हे राज्यपाल जरी असले तरी ते सरकारला दररोज लक्ष करीत आहेत. राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांना धमक्या देत आहेत. मी संयम दाखविला आहे, आता तो संपलाय.

    म्हणून त्यांना मी ट्विटरवर ब्लॉक केले आहे,” असे स्वतः ममता बॅनर्जी यांनीच सांगितले. राज्यपाल भवन हे टेलिफोन टॅपिंगचे परस्पर आदेश देत आहे. पेगॅसस सॉफ्टवेअर तेथूनच चालविले जात आहे. हा सगळा प्रकार लोकशाहीला नख लावणारा आहे, असेही त्या म्हणाल्या.
    राज्यपाल व मुख्यमंत्री पद घटनात्मक असले तरीही या दोघांमधून विस्तवही जात नाही. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केलेले आहेत.

    Angry Mamata directly blocks Governor Dhankhad on Twitter!

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती