• Download App
    भटक्याचे आयुष्य दिल्यामुळे देवावर राग, मंदिरावर दगडफेक, तरुणाला दिल्लीत अटक Anger at God for giving life to a wanderer, stone throwing at a temple, youth arrested in Delhi

    भटक्याचे आयुष्य दिल्यामुळे देवावर राग, मंदिरावर दगडफेक, तरुणाला दिल्लीत अटक

    भटक्याचे आयुष्य दिल्यामुळे देवावरचा राग काढण्यासाठी मंदिरावर दगडफेक करणाऱ्या ला पोलीसांनी अटक केली. दिल्लीतीतल पंजाबी बाग येथील मंदिरावर एका तरुणाने दगडफेक केली होती. Anger at God for giving life to a wanderer, stone throwing at a temple, youth arrested in Delhi


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भटक्याचे आयुष्य दिल्यामुळे देवावरचा राग काढण्यासाठी मंदिरावर दगडफेक करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली. दिल्लीतीतल पंजाबी बाग येथील मंदिरावर एका तरुणाने दगडफेक केली होती.

    विकी माल असे या तरुणाचे नाव आहे. पंजाब बाग येथील वैैष्णोमाता मंदिरातील महादेवाच्या दोन मूर्तींची तोडफोड झाल्याचे पुजारी रणजित पाठक यांना शनिवारी सकाळी समजले. तोडफोड केलेल्या मूर्तींजवळ दगड आणि विटांचे तुकडे सापडले होते. पाठक यांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी तातडीने तपास केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी रस्त्यावरील कचरा उचलणाऱ्या विकी माल याने केल्याचे उघड झाले.



    लॉकडाऊनच्या पूर्वी विकी हा त्याच्या वडीलांसोबत काम करत होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यावर त्याचे वडील मुळ गावी बिहारमधील मोतीहारी येथे निघून गेले. त्यानंतर विकी अस्वस्थ होता. आपल्याला भटक्याचे आयुष्य दिल्याबद्दल त्याचा देवावर राग होता. त्यातूनच त्याने शुक्रवारी रात्री वष्ैणोमाता मंदिरातील महादेवाच्या मूर्तींची तोडफोड केली. पोलीसांनी या प्रकरणी विकीवर गुन्हा दाखल केला आहे.

    Anger at God for giving life to a wanderer, stone throwing at a temple, youth arrested in Delhi

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही