• Download App
    आंध्र प्रदेश, ओडिशाला धडकणार चक्रीवादळ जवाद सज्ज, १०० हून अधिक रेल्वे रद्द, पर्यटनस्थळांवर न जाण्याचा सल्ला|Andhra Pradesh, Odisha to be hit by cyclone Jawad , more than 100 trains canceled, advice not to visit tourist destinations

    आंध्र प्रदेश, ओडिशाला धडकणार चक्रीवादळ जवाद सज्ज, १०० हून अधिक रेल्वे रद्द, पर्यटनस्थळांवर न जाण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरावर जवाद चक्रीवादळ निर्माण झाले असून, शनिवारी पहाटेपर्यंत ते ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. त्याचबरोबर अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.Andhra Pradesh, Odisha to be hit by cyclone Jawad , more than 100 trains canceled, advice not to visit tourist destinations

    चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी सायंकाळनंतर तीनही राज्यांच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने तडाखा दिला. या भागात भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफने शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.



    जवाद धडकल्यानंतर ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी १०० किमी वेगाने वारेही वाहतील. आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ ओडिशाकडे सरकणार आहे. सर्वाधिक फटका ओडिशाला बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे ओडिशानेही पूर्वतयारी केली आहे.

    ओडिशामध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलासह २६६ पथक तैनात करण्यात आले आहेत. ओडीशातील १४ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे इस्ट कोस्ट रेल्वेने १०० प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच मालवाहतूकही बंद ठेवली आहे. चक्रीवादळाचे नाव जवाद हे सौदी अरबने ठेवले आहे.

    याचा अर्थ उदार असा होतो. हे चक्रीवादळ पूर्वीच्या तुलनेत कमी नुकसानकारक असेल, असा अंदाज आहे.सर्व पथके झाडे कापण्याच्या मशीन, दूरसंचार उपकरण, बोटींसह आवश्यक साधनसामग्रीसह सज्ज आहेत.

    खबरदारी म्हणून तटरक्षक दल आणि नौदलानेही शोध आणि बचाव मोहिमांसाठी जहाज आणि हेलिकॉप्टरसह विविध ठिकाणी पथके तयार केली आहेत. पश्चिम बंगालने मच्छीमार आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा इशारा दिला आहे. दिघा, मंदरमानी, ताजपूर आणि सुंदरबन यासारख्या पर्यटन स्थळांसाठीही अलर्ट जारी केला आहे.

    Andhra Pradesh, Odisha to be hit by cyclone Jawad , more than 100 trains canceled, advice not to visit tourist destinations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते