• Download App
    राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभवच नाही – अमरिंदरसिंग यांचे टीकास्त्र|Amrindar singh targets Rahul Gandhi

    राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभवच नाही – अमरिंदरसिंग यांचे टीकास्त्र

    चंडीगड – पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही असे सांगत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी पुन्हा काँग्रेस हायकमांडवर टीका केली आहे.पक्षांतर्गत वादामुळे अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.Amrindar singh targets Rahul Gandhi

    माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आम्ही पूर्ण ताकदीनिशी सिद्धू यांच्याविरोधात लढायला तयार आहोत. या घातक माणसापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले असते तर मी आधीच राजीनामा दिला असता. मी स्वतः एक माजी सैनिक आहे त्यामुळे युद्ध कसे लढायचे हे मला चांगलेच ठावूक आहे.



    पंजाबमध्ये काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपण मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी तयार आहोत. तुम्ही कोणालाही मुख्यमंत्री करा असे आपण सोनिया गांधी यांना सांगितले होते. माझ्या म्हणण्याप्रमाणेच काही घडले नसल्याने आता मी लढायला सज्ज झालो आहे. मला न सांगताच काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलाविण्यात आल्याने अपमान झाल्यासारखे वाटले.’’

    Amrindar singh targets Rahul Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते