वृत्तसंस्था
लखनऊ : चाणक्य फेम डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा सम्राट पृथ्वीराज याचे खास दोन शो रिलीजपूर्वीच करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या साठी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात साठी हे दोन खास शो झाले. Amit Shah – Two special shows for Yogi Cabinet; Cinema tax free in Uttar Pradesh!
काल अमित शहा, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान आदी केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीमध्ये सम्राट पृथ्वीराज बघितला. यावेळी केंद्रीय गृह मंत्रालय आणि बाकीच्या मंत्रालयांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यानंतर आज लखनऊ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात साठी सम्राट पृथ्वीराज सिनेमाचा खास शो ठेवला होता. योगी आणि मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा सिनेमा बघितला. त्यानंतर झालेल्या छोटेखानी समारंभात योगी आदित्यनाथ यांनी सम्राट पृथ्वीराज सिनेमा उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केल्याची घोषणा केली.
भारताचा खरा गौरवशाली इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी सम्राट पृथ्वीराज सिनेमा टॅक्स फ्री करत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
2014 नंतर भारतीय समाजात सांस्कृतिक राष्ट्रवाद रुजत चालला आहे. भारतीय इतिहासातील गौरवशाली अध्याय पुन्हा उलगडले जात आहेत. सम्राट पृथ्वीराज हा भव्यदिव्य सिनेमा हा त्याचाच एक भाग आहे, असे अमित शहा यांनी काल सिनेमा बघितल्यानंतर सांगितले होते. योगी आदित्यनाथ यांच्या आजच्या भाषणात देखील अमित शहा यांच्या भाषणाचा धागा होता. त्यातूनच त्यांनी सम्राट पृथ्वीराज सिनेमा उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केल्याची घोषणा केली.
Amit Shah – Two special shows for Yogi Cabinet; Cinema tax free in Uttar Pradesh!
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेस सर्वपक्षीय मंजूरी; केंद्र सरकारची भूमिका काय??
- महिलांच्या अधिकारावर ‘सुप्रीम’ निर्णय : कोर्टाने म्हटले- कुटुंबातील सदस्यांना आवडत नसले तरी स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही
- नेत्यांची गळती : जे निराश होते ते निघून गेले, खरे लढणारे काँग्रेसमध्येच!!; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
- सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांसह किती जणांच्या अडचणी वाढवणार??