• Download App
    अ‍ॅमेझॉनच्या भारतातील प्रमुखांना ईडीचे समन्स, फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांचीही घेणार झाडाझडती|Amazon's India chief to be summoned by ED, Future Group promoters will also introgeted

    अ‍ॅमेझॉनच्या भारतातील प्रमुखांना ईडीचे समन्स, फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांचीही घेणार झाडाझडती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: अ‍ॅमेझॉन इंडिया आणि फ्युचर ग्रुपच्याच्या वरिष्ठ व्यवस्थापनांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने अ‍ॅमेझॉनचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल आणि फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांना पुढील आठवड्यात नवी दिल्लीतील मुख्यालयात बोलावले आहे. आतापर्यंत गोळा केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.Amazon’s India chief to be summoned by ED, Future Group promoters will also introgeted

    अ‍ॅमेझॉनने २०१९ मध्ये फ्युचर ग्रुपमधील ४९ टक्के स्टेक खरेदी करताना फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (फेमा) च्या तरतुदींचे उल्लंघन केले का? याचा तपास ईडी करत आहे. अ‍ॅमेझॉनची फ्युचर रिटेलमध्ये १० टक्के हिस्सेदारी आहे. फ्युचर ग्रुप बिग बाजार, फूड बझार चालवणारी प्रवर्तक संस्था आहे.



    ईडीने फ्युचर ग्रुपच्या संदर्भात जारी केलेले समन्स आम्हाला मिळाले आहे. आम्हाला नुकतेच समन्स मिळाले असल्याने आम्ही त्याची तपासणी करत आहोत आणि दिलेल्या मुदतीत प्रतिसाद देऊ, असे अ‍ॅमेझॉनने स्पष्ट केले आहे.

    २०१९ मध्ये भागभांडवल खरेदीसह फ्यूचर रिटेलवर अ‍ॅमेझॉनला दिलेल्या नियंत्रण अधिकारांची चौकशीही ईडीकडून करण्यात येत आहे. बहुराष्ट्रीय रिटेल कंपनी अ‍ॅमेझॉनने २०१९ मध्ये फ्युचर ग्रुपमधील ४९ टक्के स्टेक खरेदीद्वारे फ्यूचर रिटेलवर नियंत्रण अधिकारांचा दावा केला आहे.

    अ‍ॅमेझॉन कंपनीने सरकारची मंजुरी न घेताच फ्युचर रिटेलवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवले आहे, असे अ‍ॅमेझॉनच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अ‍ॅमेझॉनने ईडीच्या तपासात सहकार्य करणे अपेक्षित आहे आणि दोन्ही कंपन्यांना वैयक्तिक वित्तासह कराराच्या संदर्भात कागदपत्रे प्रदान करण्यास सांगण्यात आले आहे, असे म्हटले जाते.

    अ‍ॅमेझॉनने २०१९ मध्ये फ्युचर ग्रुपमधील ४९ टक्के स्टेक खरेदी करण्यासाठी १,४३१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी स्पर्धेच्या वॉचडॉगची मंजुरी मिळवताना माहिती लपवली आणि तथ्ये चुकीची मांडली, अशी तक्रार मार्च २०२१ मध्ये फ्यूचर ग्रुप प्रवर्तक फर्मने केली होती.

    Amazon’s India chief to be summoned by ED, Future Group promoters will also introgeted

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!