वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यात पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.Akhilesh Yadav doesn’t want Azam Khan to come out
आजम खान सध्या तुरुंगात आहेत आणि ते बाहेर येणे अखिलेश यादव यांना नको आहे. कारण अखिलेश यादव यांच्या खुर्चीला त्यांच्यामुळे धोका होईल अशी भीती त्यांना वाटते, असे खळबळजनक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आजम खान यांचा मतदारसंघ रामपूर येथे नुकतेच मतदान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आझम खान यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते तुरुंगात आहेत. यांना जामीन मिळाला नाही ही बाब न्यायप्रविष्ट आहे. याचा सरकारशी काही संबंध नाही पण मुळात आजम खान बाहेर येणे हे अखिलेश यादव यांना नको आहे. कारण त्यांच्यामुळे अखिलेश यादव यांच्या खुर्चीला धोका उत्पन्न होतो. अखिलेश यादव यांना प्रामाणिकपणे विचारा आणि त्यांना प्रामाणिकपणे उत्तर द्यायला सांगा. ते हेच उत्तर देतील की आजम खान बाहेर यायला नको आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
मतदान सुरू होतानाच योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केल्याने उत्तर प्रदेश आणि रामपूरच्या राजकारणात एक वेगळी खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतानाही दिसत आहे. आजम खान आणि अखिलेश यादव यांच्यात नेमके कशामुळे मतभेदाची दरी रुंदावली आहे यावर राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे. मतदान सुरू होतानाच योगी आदित्यनाथ यांनी हल्लाबोल करण्याची कारणेही लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहेत.
Akhilesh Yadav doesn’t want Azam Khan to come out
महत्त्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणून आहे राहूल गांधींचा राग, कुत्र्याच्या प्लेटमधील बिस्किटे दिली होती खायला
- महाराष्ट्रातील वाघाची कॉँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेल्याने शेळी, भोपाळमध्ये मात्र व्हॅलेंटाईन डे विरोधात डरकाळ्या
- इम्रान खान यांचे तिसरे लग्नही संकटात, माजी पतीला बायको कंत्राटे मिळवून देत असल्याने वाद
- देशातील सर्वात मोठ्या बॅँक फसवणूक प्रकरणात एबीजी शिपयार्डच्या माजी अध्यक्षावर गुन्हा