• Download App
    अखिलेश यादव यांचा दावा, उत्तर प्रदेशात आम्ही ३०४ जागा जिंकल्या,आमचाच झालाय विजय|Akhilesh Yadav claims, in Uttar Pradesh we won 304 seats, we won

    अखिलेश यादव यांचा दावा, उत्तर प्रदेशात आम्ही ३०४ जागा जिंकल्या,आमचाच झालाय विजय

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला पोस्टल बॅलेटपैकी ५१.५ टक्के मतदान मिळाले होते आणि या आधारावर त्यांनी 304 जागा जिंकल्या आहेत. या आधारावर सपाच विजयी झाल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.Akhilesh Yadav claims, in Uttar Pradesh we won 304 seats, we won

    अखिलेश यादव यांच्या या दाव्यावर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी प्रतिक्रिया देत निवडणुका केवळ पोस्टल बॅलेटने होत नाहीत. असे असेल तर, ईव्हीएमचा अर्थ काय? असा प्रश्न केला आहे. सपा-आघाडीला पोस्टल बॅलेट मतांपैकी ५१.५ टक्के मते मिळाली असून, याचा अर्थ सपाने ३०४ जागांवर विजय नोंदवला असे त्यांनी अखिलेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.



    हे निवडणुकीत सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विजयाबद्दल सत्य सांगत आहे. पोस्टल मतदान करणाºया प्रत्येक सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि मतदारांचे आभारही अखिलेश यांनी मानले आहेत. सत्ताधारी पक्षाने हे जाणून घेतले पाहिजे की, फसवणूक कोणतेच बळ देत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

    नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बॅलेट पेपरच्या मतदानात सपा 304 वर विजयी झाला आहे, तर भाजप फक्त 99 वर विजयी झाला आहे. पण ईव्हीएममध्ये भाजपचा विजय कसा झाला यावरून प्रश्न निर्माण होत असल्याचे सवाल सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला. मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    Akhilesh Yadav claims, in Uttar Pradesh we won 304 seats, we won

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : पंजाबमध्ये राहुल गांधींचा SPसोबत वाद; पाकिस्तान सीमेजवळ जाण्यापासून रोखले

    Vantara : वनताराने पूर्णपणे नियम पाळले; बदनामी करू नका- सुप्रीम कोर्ट; एसआयटीकडून वनताराला क्लीन चिट

    IAS Pooja Khedkar : निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईने केले ट्रकचालकाचे अपहरण; नवी मुंबईत कारला ट्रक घासल्याने घातला वाद