• Download App
    "द काश्मीर फाइल्स" नंतर पश्चिम बंगालमधील नरसंहारावर विवेक अग्निहोत्रींचा नवा सिनेमा|After "The Kashmir Files", Vivek Agnihotri's new film on the genocide in West Bengal

    “द काश्मीर फाइल्स” नंतर पश्चिम बंगालमधील नरसंहारावर विवेक अग्निहोत्रींचा नवा सिनेमा

    प्रतिनिधी

    मुंबई : “द काश्मीर फाइल्स” सिनेमा नंतर निर्माते विवेक अग्निहोत्री पश्चिम बंगाल मध्ये नरसंहार या विषयावर सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहे. “द काश्मीर फाइल्स”, “द केरल स्टोरी” यानंतर मुस्लिम दहशतवादाचे भीषण वास्तव दाखवणारा बंगाल नरसंहारावरचा सिनेमा असणार आहे.After “The Kashmir Files”, Vivek Agnihotri’s new film on the genocide in West Bengal

    विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ममता यांनी आपल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हणत चुकीचे काम केल्याचे विवेकचे म्हणणे आहे. ममता यांनी आपल्या चित्रपटात कोणता प्रचार दाखवला आहे, हे सिद्ध करावे. आपण आता पश्चिम बंगाल नरसंहारावरही चित्रपट बनवत आहेत, जो ममता यांना आवडला नसावा. विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षापासून त्याचे जगणे कठीण झाले आहे. त्यांच्या मुलीचे फोटोही व्हायरल करण्यात आले, जे लाजिरवाणे कृत्य आहे, असे अग्निहोत्री म्हणाले.



    काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

    खरेतर प्रकरण ‘द केरळ स्टोरी’ रिलीज झाल्यापासून सुरू झाले. बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काश्मीर आणि केरळनंतर आता प. बंगालला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजप अशा लोकांना निधी देतो, असे ते म्हणाले. ममता म्हणाल्या की, बंगालच्या फाइल्स बनवण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या संपूर्ण टीमच्या वतीने ममता यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ममता यांनी कोणत्या विचाराने आपल्या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे, याचे उत्तर आपल्याला हवे असल्याचे विवेक अग्निहोत्री म्हणाले

    ममतांची सवंग प्रसिद्धी

    विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, ‘देशातील काही बनावट धर्मनिरपेक्ष लोकांमध्ये स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी ममता या अशा प्रकारचे डावपेच अवलंबत आहेत. बंगाल हत्याकांडावर मी माझा चित्रपट बनवू नये अशी त्यांची इच्छा आहे. मी त्यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यांना विचारले आहे की, चित्रपटात असे काय आहे की त्यांना ते खोटे वाटते. ममताजींनी दिलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे, समाजात एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा करता येत नाही.

    After “The Kashmir Files”, Vivek Agnihotri’s new film on the genocide in West Bengal

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र