• Download App
    काश्मीरी फुटीरतावादी नेते सय्यद अहमद शाह गिलानी निधनानंतर पाकिस्तानने झेंडा अर्ध्यावर उतरविला; इम्रान खान यांचे आक्षेपार्ह ट्विट । After the death of Kashmiri separatist leader Syed Ahmed Shah Gilani, Pakistan lowered its flag in half; Offensive tweet from Imran Khan

    काश्मीरी फुटीरतावादी नेते सय्यद अहमद शाह गिलानी निधनानंतर पाकिस्तानने झेंडा अर्ध्यावर उतरविला; इम्रान खान यांचे आक्षेपार्ह ट्विट

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अहमद शाह गिलानी यांच्या निधनानंतर पाकिस्तानने आपला झेंडा अर्ध्यावर उतरवून आपली फितरत दाखवून दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलानी यांचे वर्णन सच्चा पाकिस्तानी असे करून त्यांच्या फुटीरतावादावर शिक्कामोर्तब केले आहे. After the death of Kashmiri separatist leader Syed Ahmed Shah Gilani, Pakistan lowered its flag in half; Offensive tweet from Imran Khan

    बुधवारी रात्री गिलानी यांचं निधन झाले. ही माहिती जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली होती. हैदरपोरा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते.



    मात्र गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यांनी गिलानी हे पाकिस्तानी होते असा उल्लेख करत पाकिस्तानचा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आल्याचे जाहीर केले आहे. पाकिस्तानने गिलानी यांच्या मृत्यनंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. आज गिलानी यांना सुपुर्दे-ए-खाक केले जाणार आहे.

    इम्रान खान यांनी ट्विटरवरुन गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले. गिलानी यांनी आयुष्यभर आपल्या लोकांना स्वत:च्या निर्णयाच्या हक्कासाठी लढण्यास शिकवले. भारताने त्यांना कैदेत ठेवले. त्यांच्यावर अत्याचार केले. आम्ही पाकिस्तानमध्ये त्यांच्या संघर्षाला सलाम करतो, असे म्हणून इम्रान यांनी गिलानी यांचा उल्लेख स्वातंत्र्य सैनिक असा केला आहे.

    After the death of Kashmiri separatist leader Syed Ahmed Shah Gilani, Pakistan lowered its flag in half; Offensive tweet from Imran Khan

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार