विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : धर्म हा काँग्रेसच्या राजकारणाचा आधार नाही असे काहीच दिवसांपूर्वी मंदिरांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावणाऱ्या खासदार मनीष तिवारी यांनी आता यूपीए सरकारची कमजोरी बाहेर काढली आहे. After the 26/11 attacks, the resistance of the UPA government showed weakness; Congress MP Manish Tiwari’s attack
26 /11 मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीए सरकारचा प्रतिकार कमजोर होता, असे टीकास्त्र त्यांनी आपल्या नव्या पुस्तकात सोडले आहे. 26 /11 सारखा संपूर्ण देशावर झालेला दहशतवादी हल्ला असताना यूपीए सरकारने कठोरपणे पावले टाकायला हवी होती. भारत कमजोर नसल्याचा संदेश सगळ्या जगाला द्यायला हवा होता. परंतु सरकार त्यात कमी पडले त्यामुळे जगासमोर भारताची प्रतिमा कमजोर देश अशी झाली, असे परखड टीकास्त्र मनीष तिवारी यांनी आपले नवे पुस्तक “टेन प्लांट फ्लॅश पॉईंट्स ट्वेंटी इयर्स” यातून सोडले आहे.
26/ 11 मुंबई हल्ल्याच्या वेळी केंद्रात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी हा हिंदू अतिरेक्यांनी केलेला हल्ला असल्याचे भासविले होते. पी. चिदंबरम दिग्विजयसिंह यांच्यासारख्या नेत्यांनी “हिंदू दहशतवाद” ही संकल्पना देखील देशावर लादण्याचा प्रयत्न केला होता.
या पार्श्वभूमीवर 26/ 11 च्या हल्ल्याबाबत काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी यूपीए सरकारची कमजोरी दाखविणे याला राजकीय दृष्ट्या देखील महत्त्व आहे. मनीष तिवारी यांनी नुकतीच काँग्रेसच्या नेत्यांवर आपल्या राजकारणाचा आधार धर्म नसल्याचे सांगून टीका केली होती आता त्यांच्या पुस्तकाच्या रूपाने काँग्रेसच्या संरक्षणात धोरणावर देखील प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे.
After the 26/11 attacks, the resistance of the UPA government showed weakness; Congress MP Manish Tiwari’s attack
महत्त्वाच्या बातम्या
-
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं