• Download App
    महिला, आदिवासी, दलित मंत्री; पंतप्रधानांपाठोपाठ राजनाथ सिंहांनीही विरोधकांना ठोकून घेतले After PM modi Rajnath Singh also targets Congress and opposition over new ministers introduction

    महिला, आदिवासी, दलित मंत्री; पंतप्रधानांपाठोपाठ राजनाथ सिंहांनीही विरोधकांना ठोकून घेतले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर दलित, महिला, ओबीसी आणि शेतकरीपुत्रांचा मंत्री म्हणून समावेश केला आहे. मात्र, काही लोकांना त्यांचे मंत्रिमंडळात येणे आवडलेले नाही, त्यामुळे सभागृहास त्यांचा परिचय करून देण्यास ते विरोध करत आहेत; अशा शब्दांत पंतप्रधानांनी संसदेत विरोधकांवर सोमवारी निशाणा साधला. After PM modi Rajnath Singh also targets Congress and opposition over new ministers introduction

    त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील याच मुद्द्यावर विरोधकांवर विरोधकांना ठोकून घेतले. काँग्रेसचे नेते संसदीय परंपरांचे पालन करत नाहीत. गेल्या २४ वर्षांच्या माझ्या संसदीय कारकिर्दीत मी पंतप्रधानांच्या भाषणात विरोधकांनी सुरुवातीलाच असे अडथळे आणलेले पाहिले नाहीत, असा टोला राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी, प्रामुख्याने काँग्रेस पक्षाने संसदीय परंपरांचा भंग केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षकडून करण्यात आला. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील नव्या सहकारी मंत्र्यांचा परिचय करून देण्यासाठी उभे राहिले असता काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळास प्रारंभ केला. त्यामुळे अखेर पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांची यादी सभागृहाचा पटलावर सादर केली. त्याचवेळी राज्यसभेतही विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे परिचय करून देणे शक्य झाले नाही.

    गदारोळावरून त्यावरून पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर दलित, महिला, आदिवासी, शेतकरीपुत्र असलेल्या खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संसदेत त्यांच्याविषयी उत्साहाचे वातावरण असेल, अशी माझी आशा होती. यावेळी ग्रामीण पार्श्वभूमी आणि ओबीसी समुदायातीलही खासदारांना मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा परिचय ऐकून त्यांचे अभिनंदन सभागृहात केले जाईल, असेही मला वाटले होते. मात्र, देशातील दलित, आदिवासी, महिला आणि ओबीसी यांचे मंत्री होणे सभागृहात काही लोकांना आवडलेले दिसत नाही, त्यामुळे त्यांचा परिचय करून देण्यास ते विरोध करीत आहेत; असा टोला पंतप्रधानांनी लगाविला.



    काँग्रेस पक्षाने संसदीय परंपरेचा भंग केला, असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या गदारोळावर केला.

    ते म्हणाले, संसदीय परंपरेप्रमाणे पंतप्रधान ज्यावेळी मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा परिचय करून देतात, त्यावेळी संपूर्ण सभागृह त्यांचे बोलणे अतिशय शांतपणे ऐकून घेत असते. मात्र, माझ्या २४ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये प्रथमच नव्या मंत्र्यांचा परिचय करून देताना गदारोळ झाल्याचे मी बघितले आहे. मात्र, आज काँग्रेस पक्षाने या संसदीय परंपरेचा भंग केला आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

    राज्यसभेतही सभागृह नेते आणि केंद्रीय पियुष गोयल यांनी पं. नेहरूंपासून सुरु झालेल्या परंपरेचा भंग विरोधी पक्षांनी केल्याचा टोला लगाविला.

    अधिवेशनास प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी सव्वादहा वाजता पंतप्रधानांनी संसद परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अधिवेशनात कोरोना महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटावर सविस्तर चर्चा होईल, अशी मला आशा आहे. प्रत्येकाने त्यावरील चर्चेत भाग घेऊन आपले योगदान द्यावे, जेणेकरून करोनाविरोधी लढा अधिक मजबूत होईल. विरोधी पक्षांनीही धारदार प्रश्न जरूर विचारावेत, मात्र त्यानंतर सरकारचे उत्तरही ऐकून घेण्याची तयारी ठेवावी.

    After PM modi Rajnath Singh also targets Congress and opposition over new ministers introduction

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार