विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काबूल विमानतळावरील बॉम्बस्फोटांनंतर, दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात AQIS, ISKP आणि हक्कानी नेटवर्क या तिघांकडून धमकीचा गुप्तचर इशारा जारी करण्यात आला आहे. यानुसार कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (ISKP), अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) आणि हक्कानी नेटवर्कपासून सतर्क राहण्याची गरज आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानातील या तिन्ही संघटना देशात एखादी मोठी घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था (ISI) त्यांच्यासोबत कट रचत आहे. After Kabul, terrorists now focus on India; Al Qaeda, ISIS K, Haqqani Network could strike in North India including Delhi
अफगाणिस्तानात चिघळलेली परिस्थिती आणि आयएसआयच्या विविध दहशतवादी संघटनांशी वाढती जवळीक पाहता देशातील सर्व गुप्तचर संस्था यावर बारीक नजर ठेवून आहेत. गुप्तचर यंत्रणांनी कळवले आहे की, आयएसआय दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून एक मोठा कट रचत आहे. या संघटनांच्या अतिरेक्यांद्वारे देशात हल्ला करण्याचा त्यांचा हेतू आहे. या तिन्ही संघटनांचे दहशतवादी लष्कराच्या महत्त्वाच्या सुरक्षा संस्था आणि फॉरवर्ड पोस्टला लक्ष्य करण्याची शक्यात आहे. याशिवाय दहशतवादी जवानांवरही हल्ला करू शकतात. हा गुप्तचर इशारा देशाच्या सीमा सुरक्षेशी संबंधित एजन्सीसह इतर सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आला आहे.
मेसेजिंग अॅपद्वारे संपर्क करणे
दहशतवादी संघटनांचे हे त्रिकूट मेसेजिंग अॅप्सद्वारे त्यांच्या सदस्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत येऊ नये, हाच त्यांचा यामागचा उद्देश आहे.
After Kabul, terrorists now focus on India; Al Qaeda, ISIS K, Haqqani Network could strike in North India including Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई