विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीवर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुकसोबत आघाडीमुळे सत्तेचे दरवाजे काँग्रेससाठी किलकिले झाले असले तरी केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेमध्ये काँग्रेसचा दणकून पराभव झाला आहे. After defeat congress still not in wake up mood
केरळमध्ये डाव्या आघाडीच्या विरोधातील लढाईचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधींनाही यामुळे फटका बसला आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणावर या निकालांचा कितपत परिणाम होणार याची आता चर्चा सुरु झाली आहे. मात्र कॉंग्रेस पक्ष अजूनही सुस्त असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे.
या निकालांचा पक्षावर फारसा परिणाम होणार नसल्याचे मत मुख्य पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोंदविले आहे. देशाचे सुदृढ संचालन कॉंग्रेसच करू शकते. कॉंग्रेसच असा राजकीय पक्ष आहे ज्याकडे अनुभव आणि देशाला विविधतेमध्ये एकत्र ठेवण्याची क्षमता आहे. हे निकाल संपूर्ण देशाचे प्रतिबिंब नाही, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी पक्षाच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावरून पक्ष अजूनही परिस्थितीतून फारसे काही शिकण्याच्या अवस्थेत नसल्याचे स्पष्ट होते.
काँग्रेसने असे पराभव यापूर्वीही पाहिले आहेत आणि वेळोवेळी स्वतःमध्ये दुरुस्तीही केली आहे. जनआकांक्षांशी स्वतःला जोडून प्रभावीपणे पुनरागमन केले आहे. काँग्रेसमध्ये खुलेपणाने वैचारिक चिंतन होते. पक्ष यासाठी सक्षम आहे, सांगून सुरजेवाला यांनी पराभवाच्या विश्लेषणासाठी लवकरच बैठक सत्र सुरू होईल असे संकेतही दिले.
After defeat congress still not in wake up mood
विशेष बातम्या
- 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसने पराभव केला मान्य, राहुल गांधी म्हणाले- आम्ही लढतच राहू!
- पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा ; देवेंद्र फडणवीस
- बांधकाम मजुराची बायको भाजपामुळे बनली आमदार, झोपडीत राहणाऱ्या चंदना बाऊरी यांचा विजय
- Belgaum Bypoll Result Live : बेळगावात पुन्हा कमळ फुललं ; भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय ;काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराभव