महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. मुंबई, पुणे या महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC निवडणूक) शिवसेनेसाठी नेहमीच खूप महत्त्वाची राहिली आहे. बीएमसी ही देशातील सर्वात महत्त्वाची महापालिकाच आहे. देशातील अनेक राज्यांचे वार्षिक बजेट बीएमसीच्या बजेटपेक्षाही कमी आहे.After conquering Delhi and Punjab, AAP now has its eye on Mumbai Municipal Corporation and plans to fight for all the seats
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. मुंबई, पुणे या महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC निवडणूक) शिवसेनेसाठी नेहमीच खूप महत्त्वाची राहिली आहे. बीएमसी ही देशातील सर्वात महत्त्वाची महापालिकाच आहे. देशातील अनेक राज्यांचे वार्षिक बजेट बीएमसीच्या बजेटपेक्षाही कमी आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षही बीएमसी निवडणुकीसाठी पूर्ण जोर लावत आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या हातून बीएमसीची सत्ता हिसकावून घेण्याची स्वप्ने भाजप यावेळी रंगवत आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आता आम आदमी पक्षाने म्हणजेच ‘आप’ने मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एंट्री करण्याचे ठरवले आहे.
‘आँ क्या झाडू लगाने?’ असा सवाल ‘आप’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे, असा सवाल करत आम आदमी पक्षाने एकप्रकारे बीएमसीच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे.
दिल्ली, पंजाबसारखा मुंबईत चमत्कार AAP करू शकेल?
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतरही अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी आरक्षण बहाल करण्याच्या नावाखाली स्थगिती घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने निवडणुका पुढे ढकलून प्रशासक नेमला आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने उमेदवार निवडीचे काम सुरू केले आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारालाही सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. दिल्लीत केलेल्या विकासाच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरण्याची तयारी ‘आप’ने केली आहे.
बीएमसीच्या सर्व 236 जागांवर लढण्याची आपची तयारी
मुंबई महापालिकेच्या सर्व 236 जागा लढवण्याचा ‘आप’चा विचार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अशी माहिती आपचे मुंबई सचिव संदीप मेहता यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ‘दिल्ली बदली अब मुंबई की बारी’, असा नारा ‘आप’ने दिला आहे.
निष्कलंक आणि सुशिक्षित, असे असतील आपचे उमेदवार
‘आप’च्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छ चारित्र्य असलेल्या, सुशिक्षित आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अशा उमेदवारांना तिकीट दिले जाणार आहे. ‘आप’च्या उमेदवारांनीही लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आपचे किमान 36 उमेदवार विजयी होतील, असा पक्षाला विश्वास आहे.
After conquering Delhi and Punjab, AAP now has its eye on Mumbai Municipal Corporation and plans to fight for all the seats
महत्त्वाच्या बातम्या
- पत्रकार राणा अयूबला लंडनला जाताना मुंबई विमानतळावरच रोखले, कोरोनाच्या नावाखाली
- ओएनजीसी लिमिटेड मधील 1.5% शेअर्स विकून सरकार उभारणार 3 हजार कोटी रुपये
- काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सहारणपूरमधील मौलानांची पत्रकार परिषद, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की
- वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; ऊर्जा मंत्र्यांसमवेत सकारात्मक बैठक!!
- Modi – Memon – Pawar : माजिद मेमन यांची मोदींवर स्तुतिसुमने; पण पवारांचे प्रश्न टाळून निघून जाणे!!