विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘टू स्टेट’ या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने ऑनस्क्रीन भूमिका साकारणारे अभिनेता आणि पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. काही वेळापूर्वी त्याचा अंत्यसंस्कार झाले.Actor, writer Shiv Subramaniam passes away
सोमवारची सकाळ चित्रपटसृष्टीसाठी वाईट बातमी घेऊन आली. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक शिव सुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेतला. या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मुंबईतील मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत आयोजित करण्यात आला आहे. शिवकुमार सुब्रमण्यम काही दिवसांपूर्वी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या चित्रपटातही दिसले होते.
शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल चित्रपट निर्मात्या बिना सरवर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आणि खुलासा केला की दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा जहाँचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला होता. त्यांनी लिहिले, ‘खूप दु:खद बातमी. मुलगा जहांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा जहाँ याला ब्रेन ट्युमर झाला होता. 16 व्या वाढदिवसापूर्वी त्याचे निधन झाले.
Actor, writer Shiv Subramaniam passes away
महत्त्वाच्या बातम्या
- RamNavmi JNU : जेएनयूमध्ये रामनवमीला मांसाहार वाद आणि पुण्यात नास्तिक परिषदेच्या आग्रहातून जिहादी मानसिकतेचेच भरणपोषण!!
- Sharad Pawar : “सिल्वर ओक”वर दगड – चप्पल फेक – एसटी कर्मचारी – राऊत – “मातोश्री” व्हाया राष्ट्रवादी…!!; हल्ल्याची वळणे आणि “वळसे”!!
- ST Mastermind?? : दगडफेक – चप्पल फेक सिल्वर ओकच्या रस्त्यात; राजकीय लाभाची फळे राष्ट्रवादीच्या पदरात!!