Actor Rahul Vohra death : ‘मलाही चांगले उपचार मिळाले असते, तर मी जिवंत राहिलो असतो. आता पुन्हा नव्याने जन्म घेईन आणि चांगली कामे करेन…’ हे शब्द आहेत अभिनेता राहुल वोहराचे. दिल्लीच्या राजीव गांधी रुग्णालयात त्याचे कोरोनाने निधन झाले. मृत्यूची चाहुल लागल्यावर राहुलने ही अखेरची फेसबुक पोस्ट केली होती. जी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Actor Rahul Vohra death Due to Covid 19 In Delhi, His last Facebook post gone viral
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘मलाही चांगले उपचार मिळाले असते, तर मी जिवंत राहिलो असतो. आता पुन्हा नव्याने जन्म घेईन आणि चांगली कामे करेन…’ हे शब्द आहेत अभिनेता राहुल वोहराचे. दिल्लीच्या राजीव गांधी रुग्णालयात त्याचे कोरोनाने निधन झाले. मृत्यूची चाहुल लागल्यावर राहुलने ही अखेरची फेसबुक पोस्ट केली होती. जी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोनाची लागण झाल्यावर राहुलवर उपचार सुरू होते. प्रख्यात नाट्य दिग्दर्शक-नाटककार अरविंद गौर यांनी रविवारी राहुल वोहराच्या निधनाची माहिती आपल्या फेसबुक हँडलवर दिली. त्यांनी लिहिले, “राहुल वोहरा निघून गेला. माझा गुणी अभिनेता आता या जगात नाही. काल राहुल म्हणाला होता की, मला जर चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. काल संध्याकाळी त्यांना राजीव गांधी रुग्णालयातून आयुष्मान, द्वारका येथे हलविण्यात आले, पण.. राहुल आम्ही सर्वजण तुला वाचवू शकले नाहीत, आम्हाला माफ कर!”
लवकरच पुन्हा जन्म घेईन..
शनिवारी राहुल वोहराने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमधून तो किती त्रासात होता हे स्पष्ट दिसतेय. राहुलने आपल्या अखेरच्या पोस्टमध्ये लिहिले- ‘जर मला चांगले उपचार मिळाले असते, तर मी जिवंत राहिलो असतो. लवकरच पुन्हा जन्म घेईल आणि चांगली कामे करेल. आता मी धीर सोडला आहे.’
सोशल मीडियावर प्रसिद्ध होता राहुल
मूळचा उत्तराखंडचा रहिवासी असलेले राहुल वोहरा सोशल मीडियावर त्याच्या मोटिव्हेशनल व्हिडिओंमुळे प्रसिद्ध होता. तो नेटफ्लिक्स ओरिजनल मूव्ही ‘अनफ्रीडम’मध्ये झळकला होता. गेल्या आठवड्यात त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. ज्यानंतर तो सातत्याने सोशल मीडियावर आपल्या तब्येतीचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत होता.
Actor Rahul Vohra death Due to Covid 19 In Delhi, His last Facebook post gone viral
महत्त्वाच्या बातम्या
- संकटातही लाचखोरी : नेदरलँडहून 24 तासांत आले ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर, मुंबईहून इंदुरात यायला 48 तास लागले, लाच दिल्यानंतरच झाली सुटका
- दिल्लीतील लॉकडाऊन एक आठवड्याने वाढला, उद्यापासून मेट्रोही बंद, सीएम केजरीवालांची घोषणा
- DRDO चे अँटी कोरोना औषध 11 मेपासून होणार उपलब्ध, सुरुवातीला 10 हजार डोस येणार, रेड्डींची माध्यमांना माहिती
- आसामच्या मुख्यमंत्रिपदासाठी हेमंत बिस्व सरमांची निवड, उद्याच होऊ शकतो शपथविधी
- कोरोनाविरुद्ध युद्धात ग्रामपंचायतींना केंद्र सरकारचे पाठबळ, वेळेआधीच दिले तब्बल 8923.8 कोटींचे अनुदान, महाराष्ट्राला किती जाणून घ्या…