• Download App
    तू माझा मुलगा म्हणत राहूल गांधी यांना महिलेने दिली मिठाई|A woman gave sweets to Rahul Gandhi saying you are my son

    जन्मानंतर आपला सांभाळ करणाऱ्या नर्सशी राहुल गांधींची हृदयभेट.. राजम्मा म्हणाल्या, तू माझा मुलगा!

    विशेष प्रतिनिधी

    तिरुअनंतपूरम : राहूल गांधी यांच्या केरळ दौऱ्यात त्यांना अनोखी भेट मिळाली. त्यांच्या जन्मानंतर पहिल्यांदा पाहणारी नर्स भेटली आणि तिने राहूल गांधी यांना मिठाईही दिली. केरळ काँग्रेसने एक भावनिक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.A woman gave sweets to Rahul Gandhi saying you are my son

    या व्हिडिओमध्ये एक महिला राहुल गांधींना आपला मुलगा म्हणत आहे आणि त्यांच्या हातात मिठाई देताना दिसत आहे. राहुल गांधींचा मतदार संघ असलेल्या वायनाडमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल गांधी आपला मतदार संघ असलेल्या केरळमधील वायनाड येथे दौºयावर गेले होते. त्यावेळी त्यांना ही महिला भेटली. तिने राहुल गांधींना भेटताना त्यांच्या सुरक्षारक्षकांना सांगितलं की राहुल गांधी तिला मुलासारखे आहेत. त्यांचा जन्म झाला तेव्हा सर्वात आधी या महिलेनेच त्यांना पाहिले होते असेही त्यांनी सांगितले.



    या महिलेचं नाव आहे राजम्मा अम्मा. १९ जून १९७० रोजी दिल्लीच्या ज्या होली फॅमिली रुग्णालयात राहुल गांधींचा जन्म झाला, त्याच रुग्णालयात त्या नर्स म्हणून काम करत होत्या. राहुल यांच्या जन्मावेळी त्या तिथेच होत्या. राहुल गांधींची काळजी राजम्मा यांनीच घेतली होती. त्यामुळेच त्यांनी हक्काने सांगितलं की हा माझा मुलगा आहे. याचा जन्म माझ्यासमोरच झाला आहे.

    राजम्मांनी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबद्दलही चौकशी केली आणि त्यांना आशिर्वाद दिले. राहुल गांधी तिथून जात असताना राजम्मा यांनी राहुल यांच्या हातात खाऊचा पुडाही ठेवला.राहुल गांधी हे याआधी २०१९ साली राजम्मा यांना भेटले होते. वायनाड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर ही भेट झाली होती.

    A woman gave sweets to Rahul Gandhi saying you are my son

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत