• Download App
    राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल A defamation case has been filed against Congress leader Rahul Gandhi by RSS worker Kamal Bhadauria in Haridwar court

    राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल

    (संग्रहित)

    जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण आणि कोणी दाखल केला आहे खटला?

    विशेष प्रतिनिधी

    हरिद्वार : Rahul Gandhi Defamation Case – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परदेशात जाऊन भारतीय संसदेबद्दल केलेलं वादग्रस्त विधान, मोदी आडनाबद्दलची अपमानस्पद टिप्पणी यानंतर गेलेलं संसद सदस्यत्व आणि दिल्लीतील शासकीय निवासस्थान गमावल्यानंतर आता राहुल गांधींविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल झाला आहे. A defamation case has been filed against Congress leader Rahul Gandhi by RSS worker Kamal Bhadauria in Haridwar court

    राहुल गांधींविरोधात आता उत्तराखंडमध्ये मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे., राहुल गांधी यांनी हरियाणात म्हटले होते की,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे २१ व्या शतकातील कौरव आहेत. यामुळे आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी हरिद्वार कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ही बाब ग्राह्य धरून न्यायालयाने १२ एप्रिल रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. कमल भदोरिया यांनी म्हटले आहे की, मी आरएसएसचा कार्यकर्ता असल्याने राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मी दुखावलो आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत हरिद्वार कोर्टात केस दाखल केली आहे.

    खरंतर, ९ जानेवारी २०२३ रोजी कुरुक्षेत्र अंबाला येथे राहुल गांधी यांनी आरएसएसचे वर्णन २१ व्या शतकातील कौरव असे केले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, आजचे कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि हातात काठ्या घेतात. या संदर्भात आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये कमल भदोरिया म्हणाले की, देशात कुठेही कोणत्याही आपत्तीमध्ये आरएसएस महत्त्वाची भूमिका बजावते. कमल भदोरिया यांचे वकील अरुण भदोरिया यांच्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे.

    १२ एप्रिल तारीख निश्चित केली आहे –

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कमल भदोरिया म्हणाले की, देशवासीयांच्या भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुडलेल्या आहेत. असे असतानाही राहुल गांधी यांनी असे विधान केले आहे. देशात कुठेही कोणत्याही आपत्तीत आरएसएस महत्त्वाची भूमिका बजावते आणि राहुल गांधींच्या वक्तव्याने संघाचा कार्यकर्ता म्हणून आपण दुखावलो, असे त्यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत हरिद्वार कोर्टात केस दाखल केली आहे. न्यायालयाने ही बाब मान्य करत सुनावणीची तारीख १२ एप्रिल निश्चित केली आहे.

    A defamation case has been filed against Congress leader Rahul Gandhi by RSS worker Kamal Bhadauria in Haridwar court

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही