पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. भारताकडील प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होऊन त्याला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नीरव मोदीला A British court has rejected a petition seeking extradition of Nirav Modi to India
विशेष प्रतिनिधी
लंडन: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. भारताकडील प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होऊन त्याला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नीरव मोदीची लेखी याचिका नाकारली गेली आहे. मात्र, असे असले तरी नीरव मोदीला अजूनही मौखिक सुनावणीची संधी आहे. कायदेशीररित्या नीरव मोदीकडे मौखिक सुनावणीला अपील करण्यासाठी पाच दिवसांची संधी असेल. ही अंतिम मुदतही पुढच्या आठवड्यात संपेल. नीरव मोदीला भारतीय न्यायालयासमोर प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता आहे. एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणासाठी एक आदेश जारी केला होता.
भारतातून परदेशात पळून गेलेला नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. डॉमिनिका सरकारने तर मेहुल चोक्सीला भारतात पाठवून देण्याची भूमिका घेतली आहे. डॉमिनिकाच्या तुरुंगातून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारने घुसखोर म्हणून जाहीर केले आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मेहुल चोक्सी अद्यापही भारताचा नागरिक असल्याची ठाम भूमिका मांडली आहे.पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी १३ हजार ५०० कोटींचा गैरव्यवहार केला.
या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने नीरव मोदीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने ३१ जानेवारी २०१८ रोजी नीरव, मेहुल चोक्सी आणि बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
A British court has rejected a petition seeking extradition of Nirav Modi to India
महत्त्वाच्या बातम्या
- बांताक्रुझ ! नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी आणखी एक प्रस्ताव, तणाव कमी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांचा संता- बांता जोकचा आधार
- काय शिजतंय? शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा
- जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठकीतून पंतप्रधानांचा पुढाकार चांगला, बसपच्या सुप्रिमो मायावती यांनी केले कौतुक
- मोदी सरकारने करून दाखविले, कर्जबुडव्यांकडून बॅँकांची ८० टक्यांहून अधिक रक्कम वसूल, मल्या, चोक्सी, निरव मोदीची १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त