• Download App
    120 तासांनंतरही 91 मृतदेहांची ओळख पटली नाही, ओडिशा रेल्वे अपघातावरून काँग्रेसचा रेल्वेमंत्र्यांवर हल्लाबोल|91 bodies not identified even after 120 hours, Congress attacks railway minister over Odisha train accident

    120 तासांनंतरही 91 मृतदेहांची ओळख पटली नाही, ओडिशा रेल्वे अपघातावरून काँग्रेसचा रेल्वेमंत्र्यांवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघाताला 120 तासांहून अधिक काळ लोटला आहे. अद्याप 91 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. असे अनेक मृतदेह आहेत ज्यांवर अनेक कुटुंबांचा दावा आहे. अपघातानंतर अनेक जण बेपत्ता असून, त्यांच्या नातेवाइकांच्या शोधासाठी रुग्णालय, पोलीस ठाण्यात चकरा मारल्या जात आहेत.91 bodies not identified even after 120 hours, Congress attacks railway minister over Odisha train accident

    दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी या संपूर्ण घटनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांना जबाबदार धरले आहे. अजय म्हणाले की, हे रेल्वेमंत्र्यांचे षडयंत्र होते, ज्यामुळे बालासोर ट्रेन दुर्घटनेत 288 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,000 हून अधिक लोक जखमी झाले. सीबीआयने पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांविरोधात एफआयआर नोंदवावा.



    अजय कुमार पुढे म्हणाले की, अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी ज्या पद्धतीने वागले आहे, त्यांना ऑस्कर पुरस्कार दिला पाहिजे.

    एका मृतदेहाचे 5 दावेदार, आता डीएनए चाचणी होणार

    या प्रकरणात मोहम्मद इनाम उल हक म्हणतात की, माझा एक पुतण्या आहे ज्याला आम्ही ओळखले आहे, परंतु आणखी 5 दावेदार आहेत. प्रत्येकजण तो आपला नातेवाईक असल्याचे सांगत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीराची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

    30 डीएनए नमुने दिल्ली एम्सला पाठवले जातील

    भुवनेश्वर महानगरपालिकेने सांगितले की, अज्ञात मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे केली जाईल. मृतदेहाचा दावा करणाऱ्या नातेवाईकांचे 30 डीएनए नमुने दिल्ली एम्समध्ये पाठवले जातील. येथून 7 ते 8 दिवसांत अहवाल येईल. अहवालानंतरच संबंधित मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल.

    91 bodies not identified even after 120 hours, Congress attacks railway minister over Odisha train accident

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले