विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : गेल्या सात महिन्यांत काश्मीलर खोऱ्यात ७८ दहशतवादी मारण्यात यश आले आहे. त्यापैकी ३९ दहशतवादी लष्करे तय्यबाचे होते तर अन्य दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन, अल बद्र, जैश महंमद आणि अन्सार गजवातुल हिंदशी जोडलेले आहेत. 78 terrorist neutralised in JK in seven months
काल शहरातील आलमदार कॉलनीत आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. अहमद सोफी आणि बिलाल अहमद असे मृत दहशतवाद्यांची नावे असून ते लष्करे तय्यबा संघटनेसाठी काम करत होते. दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते श्रीनगरच्या नातीपोरा भागातील रहिवासी होत.
दोन्ही दहशतवादी १४ डिसेंबर २०२० पासून घातपाती कारवायांत सामील होते. हे दहशतवादी तीन घटनांत सहभागी होते आणि जून महिन्यांपासून त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात होती. काल त्यांच्याबाबत माहिती मिळाली असता श्रीनगरच्या इदगाह भागाला वेढा घातला. यावेळी त्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु त्यांनी दाद दिली नाही आणि चकमक सुरू झाली. त्यात दोघेही मारले गेले. ते दोघेही लष्करे तय्यबात सक्रिय होते.
78 terrorist neutralised in JK in seven months
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न
- जम्मू-काश्मिरात बकरीदला गाय व उंट यांच्या कुर्बानीवर बंदी, सरकारकडून आदेश जारी
- महामारीदरम्यान देशात UPIच्या माध्यमातून वाढले डिजिटल व्यवहार, गतवर्षी झाले 41 लाख कोटींचे ट्रान्झॅक्शन
- टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप