विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 14 डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 7306 पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला आहे. या काळामध्ये दाखल केलेल्या एकूण 10,635 अर्जांपैकी 70% पाकिस्तानी नागरिकांचा वाटा आहे.
7306 Pakistani citizens apply for Indian citizenship! In 2021, a total of 1,11,287 people renounced their Indian citizenship
तेलंगणा राष्ट्र समितीचे राज्यसभेतील खासदार के केशवराव यांनी 2018 ते 2021 मध्ये पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या राष्ट्रातून भारतीय नागरिकत्वासाठी आलेल्या ऍप्लिकेशन बद्दल माहिती मागितली होती.
ही माहिती देत असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने ही आकडे समोर मांडली आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका, युनायटेड स्टेटस, नेपाळ आणि बांगलादेश या देशांसह भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज पेंडिंग आहेत. अफगाणिस्तानमधून 1152 नागरिकांनी अर्ज दाखल केला आहे. तर अमेरिका आणि श्रीलंका मधून 223 नागरिकांनी अर्ज दाखल केला आहे. नेपाळ मधून 189 आणि बांगलादेशमधून 161 लोकांनी अर्ज केला आहे. तर चायना मधूनही 10 लोकांनी नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला आहे जे अजूनही पेंडिंग आहेत.
मागील पाच वर्षात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी केला भारतीय नागरिकत्वाचा त्याग
2018 ते 2021 या काळामध्ये अल्पसंख्याक राष्ट्रांकडून भारतीय नागरिकत्वासाठी 8244 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 3117 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
ही बाजू झाली भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केलेल्यांची बाब. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत एकूण 8.5 लाख भारतीय नागरिकांनी गेल्या 7 वर्षांमध्ये भारतीय नागरिकत्त्व सोडले आहे. 20 सप्टेंबरपर्यंत ‘ह्यावर्षी’ एकूण 1,11,287 लोकांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडलेले आहे. अशी माहिती राय यांनी लोकसभेत बोलताना दिली आहे.
7306 Pakistani citizens apply for Indian citizenship! In 2021, a total of 1,11,287 people renounced their Indian citizenship
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरची गाडी, राज्यामध्ये लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री; सुधीर मुनगंटीवार
- बेकायदेशीर सावकारीबाबत थेट पुणे पोलिसांना देऊ शकता माहिती ; जारी केला एक व्हॉट्सअप नंबर
- ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ८ महत्वाच्या सूचना ; वाचा सविस्तर
- … मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी