• Download App
    काश्मींरमध्ये अवघ्या सात महिन्यांत ६६ दहशतवाद्यांचा खातमा|66 terrorists killed in Kashmir in just seven months

    काश्मींरमध्ये अवघ्या सात महिन्यांत ६६ दहशतवाद्यांचा खातमा

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : काश्मीहरच्या हंडवाडा येथे सुरक्षा दलाबरोबर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा कमांडर मेहराजुद्दीन ऊर्फ उबैद ठार झाला. दरम्यान लष्कराने गेल्या सात महिन्यांत ६६ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे.66 terrorists killed in Kashmir in just seven months

    गेल्या जून महिन्यात ११ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सर्वाधिक १७ दहशतवादी एप्रिल महिन्यांत ठार झाले होते.हंडवाडा पोलिसांना पाजीपोरा-रेनान भागात दहशतवादी असल्याची खबर लागली होती.



    त्यानुसार हंडवाला पोलिस, ३२ आर आर आणि ९२ बीएन सीआरपीएफच्या पथकाने संयुक्त कारवाई सुरू केली. सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. मात्र सुरक्षा दलाने धाडसी कारवाईत हिज्बुलचा कमांडर मेहराजुद्दीनला ठार केले.

    उबैद हा अनेक घातपाती कारवायात सामील होता. सुरक्षा दलाने घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त केला आहे. तो अनेक वर्षांपासून काश्मीार खोऱ्यात घातपाती कारवाया करत होता.

    66 terrorists killed in Kashmir in just seven months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

    Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था

    पश्चिम बंगाल मध्ये लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी ३००० रुपये, सरकारी नोकरीत महिलांना ३३ % आरक्षण!!