विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आमच्या पहिल्या अॅडव्हायझरीनंतर २०,००० हून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमधून भारतात परतले आहेत. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमधून सुमारे १०,३४८ भारतीयांना घेऊन आतापर्यंत ४८ उड्डाणे भारतात पोहोचली आहेत. 20,000 Indian nationals from Ukraine to India
पुढील २४ तासांमध्ये आणखी १६ फ्लाइटचे वेळापत्रक आहे. बागची म्हणाले की, येत्या २४ तासांत १६ उड्डाणे भारतात पोहोचल्यानंतर युक्रेनची सीमा ओलांडलेले जवळपास सर्वच भारतीय भारतात पोहोचतील. काही लोक अजूनही युक्रेनमध्ये आहेत.
आम्ही भविष्यातही फ्लाइटचे वेळापत्रक सुरू ठेऊ. पूर्व युक्रेनवर विशेषत: खार्किव आणि पिसोचिनकडे सर्वाधिक लक्ष देत आहोत. आम्ही तिथे काही बसेस मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. पाच बसेस आधीच बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. येत्या काळात आणखी काही बसेसही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिसोचिनमध्ये ९००-१००० भारतीय अडकले आहेत. त्याचप्रमाणे सुमीमध्ये ७०० हून अधिक भारतीय नागरिक आहेत. आम्हाला सुमीची काळजी आहे,असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की आम्ही युक्रेन प्रशासनाकडे विशेष ट्रेनची मागणी केली होती, परंतु अद्याप आम्हाला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करत आहोत. त्यांचे सुरक्षित परतणे हे आमचे प्राधान्य आहे. युद्धविराम झाला तर ती सर्वोत्तम गोष्ट असेल, असेही ते म्हणाले. युद्धविराम नसेल तर आमचे काम कठीण होईल.
20,000 Indian nationals from Ukraine to India
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानाला भाजपचे हायकोर्टात आव्हान!!; 10 लाख डिपॉझिट भरल्यावर मंगळवारी सुनावणी
- शेतकऱ्यांच्या मोर्चाला सामोरे जाण्याऐवजी विधानसभा तहकूब करून सत्ताधारी पळून गेले; फडणवीसांचा घणाघात
- उत्तर प्रदेश निवडणूकीचा परमोच्च बिंदू – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत जोरदार रोड शो
- कल्याणच्या रिक्षाचालकाला हेल्मेट घातले नसल्याने ठोठावला दंड ; वाहतूक पोलिसांचा अजब कारभार