विशेष प्रतिनिधी
लाहोर – पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात भोंग येथे गणपती मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर वीस जणांना अटक केली. तसेच दीडशेहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने जगभरातून टीका होवू लागली होती. तसेच पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने देखील चिंता व्यक्त केली.20 arrested in Pakistan temple attack
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजकंटकांवर कारवाई होत नसल्याने पाकिस्तान सरकारला आणि पंजाब पोलिसांना फटकारले होते.लाहोरपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रहीमयार खान जिल्ह्यातील भोंग येथे बुधवारी एका गणेश मंदिरावर समाजकंटकांनी हल्ला केला.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत वीस संशयितांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी दीडशेहून अधिक समाजकंटकांवर गुन्हा दाखल केले आहेत. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिराची दुरुस्ती केली जात आहे. पाकिस्तानच्या संसदेने काल एक प्रस्ताव मांडत मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला.
20 arrested in Pakistan temple attack
महत्त्वाच्या बातम्या
- अफगणिस्थानात तालीबान्यांचे क्रौर्य, मुली, विधवांची पिळवणूक
- सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने मोदींच्या निर्णयावर टीका करणाऱ्या बरखा दत्त यांना फटकारले होते
- येत्या तीन वर्षांत अमेरिकेसारखे होणार भारतातील रस्ते, नितीन गडकरी यांचा विश्वास
- त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न, पायी जात असताना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न
- पतीला आयपीएसची वर्दी चढविणे महिला डीवायएसपीला पडले महागात, थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला प्रकार