वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या जामशोरो जिल्ह्यात बुधवारी एका प्रवासी बसला आग लागली. या दुर्घटनेत 8 मुलांसह 18 जण जिवंत भाजले, तर अनेक जण जखमी झाले. सर्वांना जामशोरो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.18 burned alive in bus fire in Pakistan all flooded The accident happened due to AC failure
जावेद बलोच, माजी वरिष्ठ पोलीस अधीक्षक, जामशोरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस कराचीहून खैरपूर नाथन शाहला परतत होती. नूरियााबादजवळ आग लागून 18 जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये बसलेले प्रवासी हे पूरग्रस्त लोक होते आणि ते घरी परतत होते. सर्व मुगरी समाजातील होते. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मृतदेह आणि जखमींना जामशोरो येथील लियाकत विद्यापीठ रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग कोचच्या एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे लागली होती, ज्यामुळे संपूर्ण बसला आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या. बसमध्ये जवळपास 35 जण होते असे सांगण्यात येत आहे.
या घटनेची दखल घेत सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी जामशोरोच्या उपायुक्तांना तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासन कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सीएम मुराद यांनी या घटनेचा तपास अहवालही मागवला आहे.
18 burned alive in bus fire in Pakistan all flooded The accident happened due to AC failure
महत्वाच्या बातम्या
- राज्यात 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या : आस्तिककुमार पांडेय औरंगाबादचे जिल्हाधिकारी
- कर्नाटक हिजाब वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 10 दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर राखून ठेवला होता निकाल
- सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत वाढ : भाजीपाला आणि डाळींच्या किमती वाढल्याने महागाई 7.41% वर पोहोचली, ऑगस्टमध्ये 7% होती
- UNGA मध्ये रशियाविरोधात निषेधाचा ठराव मंजूर : 143 देशांचा युक्रेनच्या 4 भागांवर रशियाच्या कब्जाला विरोध, भारत मतदानापासून दूर