• Download App
    १७ वर्षीय डी.गुकेश बनला भारताचा अव्वल बुद्धिबळपटू! ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला टाकले पिछाडीवर 17 year old D Gukesh became Indias top chess player Grandmaster Viswanathan Anand was left behind

    १७ वर्षीय डी.गुकेश बनला भारताचा अव्वल बुद्धिबळपटू! ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला टाकले पिछाडीवर

    क्लासिक ओपन प्रकारात जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचा किशोरवयीन बुद्धिबळपटू डी. गुकेश याने एक विक्रमी कामगिरी  केली आहे. त्याने  गुरुवारी थेट जागतिक क्रमवारीत भारताचा अव्वल बुद्धिबळपटू म्हणून ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला पिछाडीवर टाकत, भारतातील अव्वल बुद्धिबळपटूचे स्थान पटकावले आहे. 17 year old D Gukesh became Indias top chess player Grandmaster Viswanathan Anand was left behind

    अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या FIDE विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मिस्त्रादिन इस्कंदारोवचा पराभव करणाऱ्या गुकेशचे लाइव्ह रेटिंग २७५५.९ आहे आणि तो क्लासिक ओपन प्रकारात जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर २७५४.० गुण मिळवणारा विश्वनाथन आनंद दहाव्या स्थानावर आहे.

    “गुकेशने आज पुन्हा विजय मिळवला आणि लाइव रेटिंगमध्ये विश्वनाथन आनंदला मागे टाकले. 1 सप्टेंबर रोजी पुढील अधिकृत FIDE रेटिंगची यादी येईल, यास अद्याप जवळपास एक महिना बाकी आहे, परंतु 17 वर्षीय गुकेश जगातील सर्वोच्च रेटींग केलेला भारतीय खेळाडू म्हणून टॉप-10 खेळाडूंच्या यादीत प्रवेश करेल अशी दाट शक्यता आहे.!” असे ट्वीट आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (ICF) गुरुवारी केले आहे.

    कोण आहे डी गुकेश?

    गुकेश अवघ्या  सात वर्षांचा होता जेव्हा तो बुद्धिबळ खेळायला शिकला, तो विश्वनाथन आनंदच्या मूळ गावी चेन्नईचा आहे, गुकेशने पहिल्यांदा शाळेत बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. गुकेशचे शाळेतील पहिले प्रशिक्षक श्री भास्कर होते, ज्यांनी गुकेशची प्रतिभा ओळखली. प्रशिक्षक श्री भास्कर यांनी गुकेशला मार्गदर्शन केले आणि अवघ्या सहा महिन्यांनंतर तो FIDE-रेटेड खेळाडू बनला. यानंतर विजयानंद गुकेशचे प्रशिक्षक झाले आणि त्यानंतर गुकेशला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळू लागले. 2015 मध्ये, तो आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 9 वर्षाखालील गटात चॅम्पियन बनला होता. यासोबतच कॅन्डीडेट मास्टर (सीएम) ही पदवी मिळवण्यातही तो यशस्वी ठरला. गुकेशचा पहिला मोठा विजय 2018 साली आला, जेव्हा त्याने आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत 5 पदके जिंकली. त्याच वर्षी, त्याने 10/11 च्या स्कोअरसह जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये 12 वर्षांखालील विजेतेपद जिंकले होते.

    17 year old D Gukesh became Indias top chess player Grandmaster Viswanathan Anand was left behind

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य