वृत्तसंस्था
बंगळूर : महाराष्ट्राचे शेजारी राज्यात म्हणजेच कर्नाटकात सोमवारी एक दिवसात 34 हजार 804 जणांना कोरोनाची लागण झाली असून 143 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यत 14 हजारांवर मृत्यू कोरोनाने झाले आहेत. 14,000 killed due to corona in Karnataka; 13 lakh people affected
कोरोनाचे संकट वाढताच 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन राज्य सरकारने जाहीर केला आहे.
राज्यात रुग्णसंख्या वाढतच आहे. आतापर्यँत 13 लाख 39 हजार जण कोरोनाने संक्रमित झाले आहेत. आतापर्यत 14 हजार 426 लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. त्यामुळे ही संख्या रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलून कडक लॉकडाऊन सोमवारी जाहीर केला होता.
राजधानी बंगळूरमध्ये कोरोनाची 20 हजार 733 प्रकरणे उघडकीस आल्याने राज्य सरकार हादरले असून त्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.