• Download App
    आताच काळजी घेतली नाही भारतातील १२ शहरे तीन फूट समुद्राच्या पाण्याखाली जाणार|12 cities in India will go under three feet of sea water,Nasa report

    आताच काळजी घेतली नाही तर मुंबई, चेन्नई, भावनगरसह भारतातील १२ शहरे तीन फूट समुद्राखाली जाणार…

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आताच काळजी घेतली नाही तर अजून ७९ वर्षांनी म्हणजे २१०० साली भारतातील समुद्रकिनारी असलेली बारा शहरे तीन फूट पाण्यात जातील असा इशारा नासाने दिला आहे. यामध्ये मुंबईचाही समावेश आहे. तापमान वाढीमुळे पृथ्वीवर असणारा बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे चेन्नई, कोच्ची, भावनगरसारख्या शहरांचा आकार लहान होणार आहे. किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी न्यावे लागेल. कारण तीन फूट पाणी वाढल्यानं या शहरांना मोठा धोका आहे.12 cities in India will go under three feet of sea water,Nasa report

    अमेरिकन अंतराळ संस्थेने (नासा) सी लेवल प्रोजेक्शन टूल (समुद्र पातळीचा अंदाज आराखडा) बनवला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, २१०० पर्यंत जागतिक तापमान वाढ प्रचंड होणार आहे. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण वेळीच रोखले नाही तर तापमान सरासरी ४.४. डिग्री सेंटीग्रेड वाढ होईल. पुढील दोन दशकात तापमान १.५ डिग्री सेंटीग्रेडने वाढणार आहे. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असेल तर साहजिकच बर्फ वितळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी मैदानी आणि समुद्रकिनारी मोठं नुकसान पोहचवणार आहे



    नासा प्रोजेक्शन टूलमध्ये जगभरातील नकाशा दाखवण्यात आला आहे. कोणत्या वर्षी कुठल्या भागात किती समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. आयपीसीसी दर ५ आणि ७ वर्षांनी जगातील पर्यावरण स्थितीचा आढावा देतात. संपूर्ण जगात पुढील काही दशकांत वाढणाऱ्या पाणी पातळीबद्दल टूल बनवलं आहे. हा टूल जगातील त्या सर्व देशांतील समुद्राच्या पाण्याची पातळी मोजेल जेथे समुद्र किनारे आहेत.

    सर्वात जास्त धोका असलेल्या शहरात गुजरातमधील भावनगरचा समावेश आहे. येथील समुद्राच्या पाणी पातळीत २.६९ टक्के वाढ, कोच्चीमध्ये समुद्राच्या पाणी पातळीत २.३२ टक्क्यांनी वाढ, मोरमुगाओ इथे २.०६ टक्के पाणी पातळीत वाढ होईल.

    ओखा १.९६ फूट, तूतीकोरिन १.९३ फूट, पारादीप १.९३ फूट, मुंबई १.९० फूट, मंगळुरू १.८७ फूट, चेन्नई १.८७ फूट आणि विशाखापट्टनम १.७७ फूट समुद्राची पाणीपातळी वाढेल. कांडला, ओखा आणि मोरमुगाओ इथं ३.५४ इंच, भावनगर ६.२९ इंच, मुंबई ३.१४ इंच, कोच्ची ४.३३ इंच, तूतीकोरिन, चेन्नई, पारादीप आणि मंगळुरू २.७५ इंच इतकी पाणीपातळी वाढेल. १९५ देशातून हवामान आणि उष्णता यांच्या संबंधित आकडेवारीवरुन विश्लेषण करण्यात आलं आहे.

    प्रचंड उष्णता ५० वषार्तून एकदाच येते. परंतु आता दर १० वर्षांनी ते होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान उष्ण होण्याची ही सुरुवात आहे. मागील ४० वषार्पासून उष्णता मोठ्या वेगाने वाढत आहे. १८५० नंतर चार दशकांमध्ये इतकी उष्णता वाढली नव्हती. प्रदुषणावर नियंत्रण न मिळवल्यास तापमान वाढ, अनियंत्रित हवामानाचा फटका बसू शकतो.

    वैज्ञानिक फ्रेडरिको ओट्टो म्हणाले की, वारंवार तापमान वाढल्यामुळे कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, तुर्कीच्या जंगलात आगीच्या घटनांमध्ये कमी आली नाही. जंगलात लागलेल्या आगी नियंत्रणात आणणं कठीण असतं. जर बर्फ नष्ट झाला, जंगल जळून खाक झाले तर पाणी आणि हवा यांचे संतुलन बिघडेल. प्रत्येक वर्षी जगात ४ हजार कोटी टन कार्बन डाय आॅक्साइड निर्माण होतं.

    हे उत्सर्जन जगातील मानवांमुळे होत आहे. जर २०५० पर्यंत हे प्रमाण ५०० कोटी टन कमी केले नाही तर ते धोकादायक ठरू शकतं. परंतु वर्तमान स्थितीनुसार २०५० पर्यंत प्रदूषण, वाढते तापमान, पूर यास्थितीचा सामना दुपटीनं करावा लागू शकतो. पुढील काही काळात आपल्या देशातील जमिन क्षेत्रफळ कमी होईल आणि समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होईल. ते सांभाळणं आपल्यासाठी खूप जड जाईल. पर्यावरणाला लक्षात ठेऊन विकास करायला हवा अन्यथा अनेक शहरं समुद्राखाली जातील, असा इशारा नासाने दिला आहे.

    12 cities in India will go under three feet of sea water,Nasa report

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार