• Download App
    Mammata targets BJP once again

    ममतांचा २०२४ साठी पॉवर गेम आतापासूनच सुरु, सत्ता येताच भाजपला देशात हरवण्याची भाषा

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी एकटी काही करू शकत नाही पण आपण सगळे मिळून २०२४ मध्ये भाजपचा सफाया करू शकतो, मी सर्व राजकीय पक्षांच्या संपर्कात आहे पण सध्या मात्र कोरोनाशी दोन हात करण्यावर माझा भर असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. Mammata targets BJP once again

    नंदीग्राममधील मतांच्या कथित हेराफेरीवरून देखील त्यांनी यावेळी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. नंदीग्राममधील निवडणूक अधिकाऱ्याला जिवाचा धोका असल्यानेच त्याने फेरमतमोजणी घेण्याचे आदेश दिले नाही, असेही ममता यांनी स्पष्ट केले. येथे झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांचा १९०० मतांनी पराभव केला होता.



    विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर बंगालमध्ये सत्तास्थापनेला वेग आला असून ममतांची आज तृणमूलच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आता त्या पाच मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यासाठी विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून सुव्रत मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे. ममतांनी राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी सत्तास्थापनेच्या अनुषंगाने चर्चा केली.

    Mammata targets BJP once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!